सातारा तालुक्यातील ११ सहकारी पतसंस्थांचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर


दैनिक स्थैर्य । दि. ११ जुलै २०२२ । सातारा ।  सातारा तालुक्यातील क वर्गातील 11 सहकारी संस्थांच्या सन 2022-23 ते 2027-28 या कालावधीचे संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून निवडणूक कार्यक्रम संबंधित संस्थेच्या सूचना फलकावर 12 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती सहायक निबंधक सहकारी संस्था शंकर पाटील यांनी दिली आहे.

निवडणुक जाहीर झालेल्या संस्था पुढील प्रमाणे :शाकंभरीदेवी ग्रामिण बिगरशेती पतसंस्था, नागेवाडी, अहिल्यादेवी होळकर सहकारी पतसंस्था, सातारा, दि भैरवनाथ को ऑप क्रेडिट सोसायटी लि. वेचले, अजिंक्य नागरी सहकारी पतसंस्था, किडगाव, जयभवानी नागरी सहकारी पतसंस्था, सातारा, श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था, सातारा, क्रांतीपर्व नागरी सहकारी पतसंस्था, सातारा, मराठा सहकारी पतसंस्था, सातारा, अल्फालावल एम्पलॉईज सहकारी पतसंस्था, सातारा, प्राथमिक माध्यमिक विश्वविद्यालय शिक्षक-शिक्षकेत्तर सेवक सहकारी पतसंस्था, सातारा, आयटीआय कर्मचारी व प्रशिक्षणार्थी सहकारी ग्राहक संस्था, सातारा.


Back to top button
Don`t copy text!