दैनिक स्थैर्य । दि. १७ जानेवारी २०२३ । पंढरपूर । शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या युवा सेना पंढरपूर शहर प्रमुखपदी पंढरीतील धडाडीचे समाजसेवक श्रीनिवास उपळकर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलीय. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने, युवा सेना सचिव वरुण सरदेसाई व सोलापूर जिल्हा युवा सेना विस्तारक उत्तम आयवळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीनिवास उपळकर यांची निवड करण्यात आली.
श्रीनिवास उपळकर हे गेल्या अनेक वर्षापासुन सामाजिक क्षेत्रात सक्रीय असुन त्यांनी आजतागायत विविध सामाजिक आंदोलनांच्या माध्यमातुन तळागाळातील सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवुन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. याचबरोबर पंढरपूर शहर व परिसरातील अनेक महत्वाच्या समस्यांना वाचा फोडून या समस्या सोडविण्यामध्येही त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन युवा सेनेच्या वरिष्ठ नेतेमंडळींनी त्यांना ही संधी दिली आहे.
आजपर्यंत केलेल्या सामाजिक कार्याद्वारे जनसामान्यांचा दांडगा जनसंपर्क आणि विविध क्षेत्रातील युवकांची साथ मिळाली आहे. आज युवा सेनेसारख्या मोठ्या संघटनेची जबाबदारी खांद्यावर पडलेली असताना माझी जबाबदारी आणखीनच वाढलेली असुन यापुढे शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने 80% समाजकारण व 20% राजकारण या तत्वानुसार कार्य करीन व पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे व युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे साहेब यांच्या विचारानुसार युवा सेनेचे कार्य सर्वदुर पोहोचविण्यासोबतच संघटनेमध्ये युवकांचे अधिकाधिक संघटन करुन युवा सेनेची ताकद वाढविण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करीन व वरिष्ठांनी टाकलेली प्रत्येक जबाबदारी पार पाडीन. असे मत नुतन युवा सेना पंढरपूर शहप्रमुख श्रीनिवास उपळकर यांनी व्यक्त केले.
श्रीनिवास उपळकर यांच्या निवडीनंतर त्यांच्या पंढरपूर शहरातून विविध ठिकाणी सत्कार करण्यात येत असुन त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.