
दैनिक स्थैर्य । दि. २३ ऑक्टोबर २०२२ । फलटण । रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया फलटण (आठवले गट) फलटण तालुका प्रभारी अध्यक्षपदी सतिश लक्ष्मण अहिवळे व शहराध्यक्षपदी लक्ष्मण रमेश अहिवळे यांची एकमताने निवड करणेत आली.
पक्षाचे निरीक्षक माजी नगरसेवक मधुकर काकडे विजय येवले यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार पेठ येथील समाजमंदिर मध्ये झालेल्या बैठकीमध्ये या निवडी करण्यात आल्या. तसेच महिलाध्यक्ष शहर राखी कांबळे व तालुका महिलाध्यक्ष विमलताई काकडे यांच्याही निवडी करण्यात आल्या. या निवडीबद्दल अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले.
तसेच यावेळी 4 नोव्हेंबर 2022 पक्षाचा वर्धापन दिन मोठ्या प्रमाणात साजरा करणेत येणार आहे. हा ठराव या बैठकीमध्ये करण्यात आला.
यावेळी लक्ष्मण रमेश अहिवळे (शहर अध्यक्ष), तेजस सुरज काकडे (शहर उपाध्यक्ष), अमित भाग्यवान काकडे( शहर कार्याध्यक्ष) संतोष शंकर काकडे (सचिव शहर), तालुका कार्यकारणी सतीश अहिवळे (तालुकाध्यक्ष), राहुल यशवंत काकडे (तालुका उपाध्यक्ष), मारुती मोहिते (तालुका कार्याध्यक्ष), दीपक अहीवळे (तालुका सचिव), महिला आघाडी राखी कांबळे (शहर अध्यक्ष), तालुका कार्यकारणी विमल ताई काकडे (तालुका अध्यक्ष), मीनाताई काकडे (तालुका उपाध्यक्ष), अलका बनसोडे (तालुका उपाध्यक्ष), वंदना यादव (तालुका कार्याध्यक्ष), सागर लोंढे (युथ शहर अध्यक्ष), सादिक कुरेशी (शहर अध्यक्ष अपसंख्याकी), विशाल लोंढे (युथ ता. अध्याक्ष), चंद्रकांत कांबळे (ता. अध्यक्ष अपंग विकास आघाडी), सुमन जाधव(हनुमंतवडी शाखा अध्यक्ष), माया धाईंजे (हनुमंत वडी शाखा उपाध्यक्ष), मंगल राऊत (हनुमंतवाडी शाखा कार्याध्यक्ष), विमल खिलारे (हनुमंतवाडी शाखा सचिव) उपस्थित होते.