विवा फाउंडेशनच्या रायगड जिल्हा अध्यक्षपदी “संकल्प केळकर” यांची निवड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


परिश्रम आणि प्रामाणिकपणा याचे समीकरण म्हणजे “संकल्प केळकर”

स्थैर्य, अलिबाग, दि. ०४, (प्रवीण रसाळ) : विवा फाउंडेशनचे सर्वेसर्वा विक्रांत वार्डे यांच्या मार्गदर्शनाने प्रेरित होऊन निषाद सांस्कृतिक मंडळ आणि विवा फाउंडेशनच्या सार्वभौमत्वाखाली सामाजिक बांधिलकी जपत अनेक तरुणांनी संस्थेची धुरा आपल्या भक्कम खांद्यावर सांभाळली, समाजाप्रती आपुलकी व सदभावना ठेवून विविध माध्यमातून, प्रकल्पातून समाजाचे उतराई होण्याचे महत्कार्य करण्याच्या संधीचे त्यानी अक्षरशः सोने केले त्या तरुणांतीलच लक्षवेधी कार्य करणारे एक तरुण “संकल्प केळकर”

ज्याप्रमाणे बावनकशी सोन आपलं अस्तित्व स्वयंसिद्ध करतो त्याचप्रमाणे संस्थेशी प्रामाणिक राहून आपल्या मृदू आणि प्रामाणिक स्वभावाने संस्थेच्या कार्यात बहुमूल्य योगदान देणारे संकल्प केळकर यांना वेगळ्या परिचयाची गरज नाही, त्यांच्या आजवरच्या कार्याने पावलोपावली त्यांच्या योग्यतेची प्रचिती दिली आहे व त्याच योग्यतेचा सन्मान करीत विक्रांत वार्डे यांनी संकल्प केळकर यांची निवड रायगड जिल्हा अध्यक्षपदी केल्याचे त्यांनी आमच्या प्रतिनिधींना सांगितले, परिश्रम आणि प्रामाणिकपणाच्या कसोटीवर खर उतरणाऱ्या व्यक्तीला यश मिळाल्याशिवाय राहत नाही असे मत ही त्यांनी व्यक्त केले.

सदर निवडीनंतर संकल्प यांना गहिवरून आले व विक्रांत वार्डे यांच्या विश्वासास सार्थकी ठरवण्याकरता यापुढे ही अथक परिश्रम व मेहनत घेत स्वतःला “ग” ची बाधा होऊ न देता सामाजिक कार्यात आपले निस्वार्थ योगदान करीत राहील असे मत संकल्प केळकर यांनी व्यक्त केले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!