भाजप अनुसूचित जाती जिल्हा उपाध्यक्षपदी संजय गायकवाड यांची निवड


दैनिक स्थैर्य | दि. ३० डिसेंबर २०२३ | फलटण |
भाजप अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्षपदी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे कट्टर समर्थक संजय गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या जिल्हाध्यक्ष कार्यालयात जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम आणि सुनील काटकर यांच्या हस्ते संजय गायकवाड यांना नियुक्तीपत्र देण्यात आले, यावेळी अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित भिसे उपस्थित होते.

या निवडीबद्दल फलटण नगर परिषदेचे विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, विधानसभा प्रमुख सचिन कांबळे पाटील, सरचिटणीस जयकुमार शिंदे, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अमरसिंह नाईक निंबाळकर, सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, माजी नगरसेवक अशोकराव जाधव, माजी नगरसेवक सचिन अहिवळे, फलटण तालुका अध्यक्ष बजरंग नाना गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, सुनील घोलप या सर्वांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


Back to top button
Don`t copy text!