काँग्रेसच्या रायपूर अधिवेशन प्रदेश व्यवस्थापन समितीवर राजेंद्र शेलार यांची निवड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २० फेब्रुवारी २०२३ । सातारा । अखिल भारतीय काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या नियोजनासाठी काँग्रेस पक्षाने प्रदेश निहाय व्यवस्थापन समित्यांची स्थापना केली असून महाराष्ट्र प्रदेश व्यवस्थापन समितीमध्ये प्रदेश काँग्रेसचे चिटणीस राजेंद्र शेलार यांचा समावेश करण्यात आला आहे. शेलार यांच्या निवडीबद्दल सातारा जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला व त्यांचे अभिनंदन केले आहे.
अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे ८५ वे राष्ट्रीय अधिवेशन २४ ते २६ फेब्रुवारी दरम्यान रायपूर, छत्तीसगड येथे संपन्न होत आहे. या अधिवेशनाला देशभरातून जवळपास ९००० काँग्रेस प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. यामध्ये राष्ट्रीय पातळीवरील वरिष्ठ नेते, राज्यस्तरावरील नेते व देशातील प्रत्येक ब्लॉकमधून (तालुक्यातून) निवडून आलेल्या प्रतिनिधींचा समावेश आहे. तीन दिवस होणाऱ्या या अधिवेशनाचे नियोजन छत्तीसगड प्रदेश काँग्रेस कमिटीने केले आहे. अधिवेशन काळात सर्व कामकाज सुरळीत होण्यासाठी देशातील सर्व प्रदेश काँग्रेस स्तरावर छत्तीसगड काँग्रेसचे दोन वरिष्ठ पदाधिकारी व प्रदेश काँग्रेसचे सहा पदाधिकारी मिळून व्यवस्थापन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने स्थापन केलेल्या समितीत प्रदेश काँग्रेसचे चिटणीस राजेंद्र शेलार यांचा समावेश केला असून नागपूरचे जेष्ठ नेते नाना गावंडे या समितीचे प्रमुख आहेत.
राजेंद्र शेलार यांना रायपूर अधिवेशनात महत्वाची संधी मिळाल्यामुळे सातारा जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. राजेंद्र शेलार हे काँग्रेसचे निष्ठावान, अभ्यासू कार्यकर्ते आहेत. अलीकडच्या काळात काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर विशेष जबाबदारी सोपवली आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत पदयात्रा मार्ग व वाहतूक व्यवस्थापन समितीमध्ये त्यांची निवड करण्यात आली होती. प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी शेलार यांच्यावर पुन्हा रायपूर अधिवेशनातील महत्वाची जबाबदारी सोपवली आहे. या निवडीबद्दल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा व सातारा जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी शेलार यांचे अभिनंदन केले.

Back to top button
Don`t copy text!