दैनिक स्थैर्य । दि. १० मे २०२२ । फलटण । अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या सातारा जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्याचे नियुक्ती पत्र नुकतेच अखिल भारतीय साहित्य परिषदेचे अध्यक्ष शरद गोरे यांच्या हस्ते देण्यात आले.
प्राध्यापक नितीन नाळे सुप्रसिद्ध वक्ते, विचारवंत, कवी आणि समाज प्रबोधन करणारे बिनीचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. सध्या ते श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या महात्मा फुले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मध्ये २२ वर्षे ज्ञानदानाचे कार्य करत आहेत.
आज अखेर एक हजार अधिक व्याख्याने त्यांनी दिली आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. अनेक शाळा, कॉलेज, महाविद्यालयात आयोजित काव्य संमेलनात साहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून सहभाग त्यांनी सहभाग घेतला आहे. शिवाय कनिष्ठ महाविद्यालयीन भूगोल परिषद राज्य कार्यकारणी सदस्य, कनिष्ठ महाविद्यालय महासंघ फलटण तालुका संघटक म्हणून त्यांनी जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.
त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा वाठार निंबाळकर येथे झाले तर माध्यमिक शिक्षण हुतात्मा परशुराम विद्यालय वडूज, यशवंतराव चव्हाण हायस्कूल फलटण इथून झाले आहे. मुधोजी महाविद्याल फलटण इथून भूगोल विषयात पदवीचे शिक्षण घेतले.त्यांनी पदव्युत्तर शिक्षण MA , Msc शिवाजी विद्यापीठातून पूर्ण केले. शिवाजी महाविद्यालय सातारा येथून Bed पूर्ण केले. त्यांनी आपल्या शिक्षण शारदेची सेवा गुरुकृपा कॉलेज ऑफ एज्युकेशन ऍण्ड रिसर्च कल्याण पश्चिम इथून सुरू केली तर सध्या ते श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या महात्मा फुले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मध्ये कार्यरत आहेत.
त्यांच्या निवडीबद्दल सामाजिक,राजकीय, धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.