रयत शिक्षण संस्थेच्या दक्षिण विभागाचे चेअरमन व मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य म्हणून माधवराव मोहिते यांची निवड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. १८ : रयत शिक्षण संस्था सातारा या संस्थेच्या दक्षिण विभागाचे चेअरमन व मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य म्हणून मोहित्यांचे वडगावचे सुपुत्र समाजभूषण माधवराव बाळकृष्ण मोहिते दादा याची 2020 ते 2023 या 3 वर्षासाठी चौथ्यांदा निवड झाली.

रयत शिक्षण संस्थेचा दक्षिण विभाग हा सांगली ,कोल्हापुर,रत्नागिरी,सिंधुदुर्ग,बेळगाव या 5 जिल्ह्यांचा असून प्राथमिक, माध्यमिक, उच्चमध्यमिक, आय टी आय, महाविद्यालये अशा 126 शाखांचा कारभार या विभागातून चालतो. डॉ. पतंगराव कदम साहेब यांचे आशीर्वाद, डॉ एन.डी. पाटील, डॉ.अनिल पाटील,डॉ सरोज पाटील उर्फ माई , ना.डॉ.विश्वजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली या विभागाची धुरा दादांनी समर्थपणे सांभाळली आहे.

माधवराव दादा यांच्या निवडीबद्दल डॉ .एन.डी. पाटील,डॉ.अनिल पाटील,ना.डॉ विश्वजित कदम,सरोज पाटील उर्फ माई, लोकनेते आ. मोहनराव कदम, महेंद्रअप्पा लाड, सरपंच विजय मोहिते ,ग्रामस्थ आदींनी अभिनंदन केले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!