दैनिक स्थैर्य । दि.३१ डिसेंबर २०२१ । फलटण । फलटण दूध उत्पादक संघ फलटण येथील पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झालेली असून शेरेचीवाडी (ढ) गावचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष हणमंतराव चव्हाण यांची संचालक पदी बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. फलटण दूध उत्पादक संघावर मागील अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत राजे गटाचे वर्चस्व असून या वर्षीचीही संचालक मंडळाची निवड ही बिनविरोध करून हे वर्चस्व अबाधित राहिले आहे.
हणमंतराव चव्हाण हे राजे गटाचे खंदे समर्थक असून राजेघराण्याचे अत्यंत विश्वासू समजले जातात. श्रीराम सहकारी साखर कारखान्यामध्ये शेती अधिकारी म्हणून काम करत असताना कामगार युनियन च्या माध्यमातून ते नेहमीच सक्रीय राहिलेले आहेत. फलटण तालुक्यामध्ये राजे गटाच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. दुध उत्पादन व प्रशासन याचाही त्यांचा चांगला अनुभव आहे. याचीच दखल घेत विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्य खो – खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व पंचायत समितीचे सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांनी हणमंतराव चव्हाण यांची बिनविरोध निवड करून त्यांचे विशेष अभिनंदन केले.
या निवडीबद्दल हणमंतराव चव्हाण यांचे आमदार दिपकराव चव्हाण, महानंदाचे उपाध्यक्ष डी. के. पवार, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील अनपट (दत्ता), शेरेचीवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच सौ. दुर्गादेवी नलवडे, ग्रामपंचायत सदस्य सौ. राणी चव्हाण, अभिजीत मोहिते, शितल फडतरे, महेश बिचुकले व सर्व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.