
दैनिक स्थैर्य | दि. २८ फेब्रुवारी २०२४ | कोळकी | कोळकी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विकास नाळे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी डॉ. अशोक नाळे यांनी आपला अर्ज सरपंच सौ. अपर्णा विक्रम पखाले यांच्याकडे दाखल केला आहे.
फलटणचे उपनगर समजले जाणाऱ्या कोळकी ग्रामपंचायतीसाठी विविध पदांसाठी नेहमीच रस्सीखेच लागून राहिलेली असते. यामध्ये कोळकी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदासाठी अनेक सदस्यांनी फिल्डिंग लावली होती त्यामध्ये डॉ. अशोक नाळे यांची वर्णी लागली आहे.
सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे गाव म्हणून कोळकीची ओळख आहे. श्रीमंत संजीवराजे हे राज्य व जिल्हा पातळीवरून नेहमीच कोळकीसाठी विविध विकासकामे मंजूर करून आणत असतात व तालुक्यात कोळकीला नेहमीच झुकते माप ते देत असतात.