दैनिक स्थैर्य | दि. २२ नोव्हेंबर २०२४ | फलटण |
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने २५५ फलटण (अ.जा.) विधानसभा मतदारसंघामध्ये आदर्श मतदान केंद्र ३३७ धुमाळवाडी, ता. फलटण येथे जिल्हा परिषद शाळेत जय किसान मतदान केंद्र उभारण्यात आले होते. फलटणचे निवडणूक निरीक्षक नूह. पी. बावा यांनी येथील जय किसान मतदान केंद्र येथील फळांविषयीच्या माहिती केंद्रास भेट दिली.
याप्रसंगी निवडणूक निरीक्षक नूह. पी. बावा यांनी फळांचे महत्त्व याविषयीचं जय किसान मतदान केंद्राची थीम उत्कृष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. विविध फळांबद्दल माहिती, त्यांचे आहारातील महत्त्व तसेच फळांचे ठेवलेले नमुने यांची पाहणी केली. विविध फळांवर लिहिण्यात आलेले मतदानाविषयीचे महत्त्व आणि फळांचे महत्त्व, आरोग्यासाठी असणारी माहिती तसेच नैसर्गिक वारसा लाभलेले धबधबे यांची छायाचित्रे याचे कौतुक करून स्वीप टीमचे अभिनंदन केले. यावेळी नोडल अधिकारी स्वीप फलटण सचिन जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते.
जय किसान आदर्श मतदान केंद्रामध्ये फळांचे सेवन केल्यानंतर आपल्याला त्यामधून काय अन्नद्रव्य मिळणार आहेत, काय जीवनसत्व मिळणार आहेत, याचं महत्त्व देणारे माहितीफलक असल्याने हे मतदारांचे आकर्षण ठरले होते. तसेच फळांच्या ‘सेल्फी पॉईंट’वर मतदार सेल्फी घेत होते. यावेळी डाळींब, सीताफळं अंजीर, चिक्कू, आवळा, पेरू असे विविध फळांच्या टोकरी त्या ठेवण्यात आले होते. येथे आदर्श केंद्राची स्थापना करण्यात आली होती. जास्तीत जास्त मतदार या केंद्राकडे आकर्षित करून मतदानाचा टक्का वाढावा, हा मुख्य उद्देश आदर्श केंद्र स्थापन करण्याचा होता.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा नोडल अधिकारी याशनी नागराजन, निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी फलटण सचिन ढोले, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार फलटण डॉ. अभिजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण तालुक्यामध्ये एकूण सात मतदान केंद्र स्थापन करण्यात आले होते. त्यामध्ये सखी मतदान केंद्र २५६ कोळकी, सखी मतदान केंद्र १९२ मुधोजी हायस्कूल फलटण शहर, सक्षम मतदान केंद्र क्रमांक १५५ वाठार निंबाळकर, युवा मतदान केंद्र २२३ गोखळी,मतदान केंद्र क्रमांक २४५ विडणी, ऐतिहासिक वारसा मतदान केंद्र क्रमांक१९८, २०२ २०३,२०५ मुधोजी प्राथमिक विद्यामंदिर फलटण शहर, जय किसान मतदान केंद्र ३३७ धुमाळवाडी असे एकूण ७ आदर्श मतदान केंद्र उभारण्यात आले होते.