दैनिक स्थैर्य । दि. २८ एप्रिल २०२२ । फलटण । राज्यातील मुदत संपलेल्या महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्यासाठी आमची यंत्रणा सज्ज असल्याची ग्वाही राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात दिली आहे.
येत्या १७ जुन ते ११ जुलै या कालावधीत निवडणुका घेणे शक्य असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या शपथपत्रात म्हटले आहे.
सदरील प्रकरणात ४ मे रोजी सुनावणी होणार असुन त्यावेळी प्रतिवादी राज्य शासन व राज्य निवडणूक आयोगाची पुढील सुनावणी किंवा मुदतवाढीची विनंती मान्य करता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
राज्य शासनाने ११ मार्च रोजी प्रभागरचनेचे अधिकार स्वतः कडे ठेवणारा कायदा मंजूर केला आहे. त्याला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.