खासदार रणजितसिंह यांना मागील निवडणुकीपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून आणा – मकरंद देशपांडे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १० डिसेंबर २०२३ | फलटण |
फलटण विधानसभा मतदारसंघातील पदाधिकार्‍यांनी ग्रामीण व शहरी भागातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठीही झटावे. खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांनी लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात काम केले आहे. गेल्या ५० वर्षात जिव्हाळ्याचा असणारा पाणीप्रश्न राजकीयदृष्ट्या अडकवला होता. तो सोडवण्यासाठी गेली चार वर्षे संघर्ष केला व पाणीप्रश्न सोडवला. रेल्वे, रस्ते, एमआयडीसी, दवाखाना, कोर्ट अशी अनेक विकासकामे मार्गी लावली. त्यामुळे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना गेल्या वेळीपेक्षा जास्त मतांनी विजयी करावे, असे आवाहन भाजपा पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांनी केले आहे.

फलटण तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कोअर कमिटीची बैठक पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांच्या उपस्थितीत व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली भाजप कार्यालयात संपन्न झाली. त्यावेळी देशपांडे बोलत होते.

यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, विधानसभा प्रमुख सचिन कांबळे पाटील, फलटण तालुका प्रभारी विश्वासराव भोसले, जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम शिंदे, जिल्हा चिटणीस बाळासाहेब कदम, पूर्व मंडल अध्यक्ष बजरंग गावडे, पश्चिम मंडल अध्यक्ष अमोल सस्ते, महिला अध्यक्षा उषा राऊत उपस्थित होत्या.

यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की, माढा लोकसभा मतदारसंघातील पक्ष संघटनेसाठी वेळ देऊन कार्यकर्त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न करत आहे. लवकरच पश्चिम महाराष्ट्राच्या पक्ष संघटनेसाठी एकाच ठिकाणी ‘वॉर रूम’ तयार करण्याचा माझा मानस आहे. विकास कामांबरोबरच पक्ष संघटनेसाठी वेळ देणार आहे. प्रत्येक बूथ रचनेचा मी स्वतः आढावा घेणार आहे. मी स्वतः तीन बूथची जबाबदारी घेऊन त्या बूथमधील समिती तयार झाली आहे का, हे पाहणार आहे. विजयासाठी एक्कावन टक्केची लढाई करावी लागेल. तरी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, अशा सूचना दिल्या.

यावेळी जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी पक्षाची रचना लवकर करावी व सुपर वॉरियरसला बूथ वाटून देऊन त्यांच्याकडून बूथ समिती सक्षम करावे. लवकरच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा होणार आहे.

यावेळी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष धनंजय पवार, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सचिन अहिवळे, महादेव अलगुडे, विस्तारक शरद झेंडे, राजेंद्र काकडे, संतोष गावडे, संतोष सावंत, सुनील जाधव, नितिन जगताप, सूरज तांदळे, विशाल नलवडे, जालिंदर सस्ते, युवराज सस्ते बबलु मोमीन, रियाज इनामदार व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.


Back to top button
Don`t copy text!