कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत श्रीमंत रामराजेंच्या नेतृत्वाखालील सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्क्याने निवडून द्या – श्रीमंत संजीवराजेंचे आवाहन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २४ एप्रिल २०२३ | फलटण |
फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्क्याने निवडून देण्याचे आवाहन सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.

श्रीराम मंदिर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रचाराचा नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी श्रीमंत संजीवराजे बोलत होते. याप्रसंगी आमदार दीपक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, यशवंत बँकेचे माजी व्हा. चेअरमन राजेंद्र भोईटे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

श्रीमंत संजीवराजे पुढे म्हणाले की, कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करण्याचा आमचा प्रयत्न फोल ठरला. ही निवडणूक काहीजणांनी निष्कारण सभासदांवर लादली आहे. या निवडणुकीमध्ये आमचा विजय प्रचंड मताधिक्क्याने होणार आहे.


Back to top button
Don`t copy text!