फरांदवाडी येथे विहिरीत पडून वृद्धेचा मृत्यू


स्थैर्य, फलटण, दि. १० ऑक्टोबर : तालुक्यातील फरांदवाडी येथील पाणीपुरवठा विहिरीत पडून शोभा शशिकांत मोहिते (वय ६५, रा. फरांदवाडी) या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. ही घटना दि. ९ ऑक्टोबर रोजी रात्री १० ते दि. १० ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान घडली.

शोभा मोहिते या विहिरीतील पाण्यात पडल्याचे निदर्शनास आल्यानंतर, त्यांना बाहेर काढून उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे नेण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून त्या उपचारापूर्वीच मयत झाल्याचे घोषित केले.

या घटनेची माहिती राजेंद्र सिताराम नाळे (रा. दुधेबावी) यांनी फलटण शहर पोलिसांना दिली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पोलीस हवालदार ए. पी. रणवरे पुढील तपास करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!