दैनिक स्थैर्य । दि. ११ जानेवारी २०२३ । मुंबई । ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना काल एसीबीची चौकशीसाठी नोटीस आली. अवैद्य मालमत्तेसंदर्भात ही नोटीस पाठवण्यात आली आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान कलम ३५३ नुसार त्यांच्याविरधात गुन्हा दाखल झाला आहे. यावरुन आता नितीन देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा दिला आहे.
‘माझ्याविरोधात तक्रार देणाऱ्या व्यक्तीच आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच फोनवर झालेल संभाषण काय आहे, देशमुख यांना इकडे आणण्यासाठी झाले, मी हे संभाषण व्हायरल करणार असल्याचा इशारा आज नितीन देशमुख यांनी दिला.
मला मिळालेल्या नोटीसमध्ये तक्रारदाराचे नावच नाही. नोटीसमध्ये माझी कोणती प्रॉपर्टी अवैद्य आहे, हेच दिलेले नाही. मी प्रतिज्ञापत्रात माझ्या प्रॉपर्टीची दिली आहे. मी आमदार झाल्यानंतर जी प्रोपर्टी घेतली त्याची माहिती तहसीलदार कार्यालयात दिली आहे, असंही नितीन देशमुख म्हणाले.
‘या प्रॉपर्टीसाठी पैसे कुठून आले हे विचारायला हवे याची माहिती मी देऊ शकतो. माझ्याविरोधात तक्रार करणारा व्यक्ती गुन्हेगार आहे, तो अकोला येथील आहे. तो खंडणी बहाद्दर आहे. असा व्यक्ती माझ्याविरोधात तक्रार करतो, आणि एसीबी त्याची दखल घेते हा मोठा चिंतेचा विषय आहे, असंही नितीन देशमुख म्हणाले.
आपल्या देशात लोकशाही आहे, तक्रारदाराचे निवारण झाले पाहिजे. तक्रारदार जर तो व्यक्ती असेल, आणि त्या व्यक्तीचे आणि मुख्यमंत्री यांचे जे संभाषण झाले असेल, त्यात मला तिकडे आणण्यासाठी संभाषण झाले मी एक दिवस ती क्लिप व्हायरल करणार, असल्याचा इशारा नितीन देशमुख यांनी दिला.