![](https://i0.wp.com/sthairya.com/wp-content/uploads/2025/02/78199106-9be2-4983-bb29-95074e24862b.jpg?resize=780%2C470&ssl=1)
दैनिक स्थैर्य | दि. १० फेब्रुवारी २०२५ | फलटण | शिवसेनेचे मुख्यनेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस फलटण तालुक्यात उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराजे देसाई, संपर्क प्रमुख शरदराव कणसे, जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनात फलटण तालुका शिवसेना प्रमुख नानासो इवरे यांनी विविध उपक्रम आयोजित केले.
कुरवली ता. फलटण येथील जेष्ठ नागरीक संघाच्या वृद्धाश्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फळ वाटप करण्यात आले. वृद्धाश्रमात जेष्ठांच्या समवेत एकत्र येऊन त्यांनी वाढदिवस साजरा केला. यावेळी व्यवस्थापन व सर्व सदस्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने आर्शिवाद दिले.
अलगुलेवाडी येथील पाचपांडव आश्रम शाळेत २६० विद्यार्थी शिक्षण घेतात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना स्वच्छ पाणी मिळावे व त्यांचे आरोग्य चांगले राहवे म्हणून पाणी शुध्दी करण यंत्र (आरो फिल्टर) देण्यात आले. यावेळी विद्यार्थी व शिक्षक वर्गाने आरोग्याचा वसा घेतलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या दीर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमात फलटण तालुका प्रमुख नानासो इवरे, संजय गांधी निराधार योजना सदस्य सीखदेव फुले, पवारवाडीचे माजी सरपंच ज्ञानेश्वर पवार, उपतालुकाप्रमुख सुभाष पवार, लक्ष्मण गोडसे, राजाभाऊ गोफणे, संपत पवार, उमेश भगत आणि अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
फलटण तालुका शिवसेना प्रमुख नानासो इवरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांच्या दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. या उपक्रमांमुळे समाजात एकता आणि सामाजिक सेवेची भावना जागृत झाली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या या उपक्रमांनी समाजात सामाजिक सेवा आणि एकतेची भावना जागृत केली. या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्यासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या.