स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त एकनाथ देशमाने यांचा राज्यभर सायकल प्रवास


दैनिक स्थैर्य । दि. ३१ ऑक्टोबर २०२२ । बारामती । सायकल चालवा इंधन वाचवा पर्यावरण वाचवा असा संदेश देत बारामतीचे सायकल पट्टू एकनाथ देशमाने यांनी राज्यात सायकल प्रवास केला. बारामती येथील सायकल पट्टू एकनाथ देशमाने वय वर्ष 52 याने भारताचा अमृत महोत्सव या निमित्त सामाजिक बांधिलकी जोपासत महाराष्ट्र राज्याचा सायकल दौरा संपन्न केला.

बारामती येथून 15 ऑगस्ट रोजी सदर सायकल दौऱ्यास प्रारंभ करण्यात आला. राज्यातील 36 जिल्हे व 8550 किलोमीटर चा सायकल प्रवास करून रविवार 16 ऑक्टोम्बर रोजी बारामती मध्ये आगमन झाले.

देशाला स्वातंत्र्य मिळत असताना ज्यांनी ज्यांनी बलिदान दिलं त्यांच्या समरणार्थ व आवश्यक ठिकाणी सायकल चालवा, इंधन वाचवा व पर्यावरण वाचवा असा संदेश देत व मुकामाच्या ठिकाणी सायकल चालविण्यामुळे शरीरास होणारे फायदे व आवश्यक ठिकाणी सायकल चालवली च पाहिजे त्यामुळे इंधन बचत कशी होती याचे पत्रके वाटून उपस्तित यांना सायकल चे फायदे या विषयी मार्गदर्शन केले.
घर व व्यवसाय किंवा नोकरीचे कार्यालय जवळ असेल तर सायकल चालविणे हे शासनास सक्तीचे करावे लागेल त्याची वेळ येऊ नये म्हणून प्रत्येकानी देश भक्ती म्हणून सायकल वापरावी असेही आवाहन सायकल पट्टू एकनाथ देशमाने यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!