श्री मंगल मारुती मित्र मंडळाच्यावतीने ’एक वही मोलाची’ उपक्रमाचे आयोजन

सातार्‍यातील विविध शाळेतील 100 हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना लाभ


दैनिक स्थैर्य । 2 ऑगस्ट 2025 । सातारा शहराच्या पश्चिम भागातील उपक्रमशील श्री मंगल मारुती मित्र मंडळ मंगळवार पेठ यांचे वतीने दरवर्षी प्रमाणे ’ एक वही मोलाची ’ या उपक्रमा अंतर्गत गरजू व हुशार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात आले पहिल्या टप्प्यात परिसरातील आबासाहेब चिरमुले विद्यामंदिर व बापुसाहेब चिपळूणकर प्राथमिक शाळा तसेच इतर शाळांतील अनेक विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वरूपात आणि मंडळाच्या बाल कार्यकर्त्यांना अभ्यासात प्रोत्साहन मिळावे म्हणून हे साहित्य देण्यात आले. सुमारे 100 हून अधिक विद्यार्थ्यांना या साहित्याचा लाभ झाला त्यामुळे त्यांच्या चेहर्‍यावर चा आनंद लपत नव्हता.

आबासाहेब चिरमुले विद्यामंदिर येथील कार्यक्रमास मंडळाच्या हितचिंतक बेकवेल बेकरी व जकातवाडी येथील निराधार प्राण्यांची देखभाल करणारे व्हि केअर सेंटर यांच्या संस्थापिका जस्मिन अफगाण व त्यांच्या सहकारी ऋतुजा मोंडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मंडळाच्या उपक्रमा चे कौतुक करून त्यांनी प्राणी असो वा मानव गरजू लोकांच्या पाठीशी समाजाने उभे राहिले पाहिजे असे आवाहन केले.

बापुसाहेब चिपळूणकर प्राथमिक शाळा येथील कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष आनंद गुरव उपाध्यक्ष श्री अमोल गुरव बाळासाहेब भाटे अशोक काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी श्री. भाटे यांनी मुलांचे प्रबोधन होईल अशा गोष्टी सांगितल्या .आनंद गुरव यांनी मंडळाच्या या उपक्रमातील सातत्या बद्दल कौतुक केले .चिरमुले शाळेच्या मुख्याध्यापिका सौ तांबे व बापुसाहेब चिपळूण कर शाळेचे मुख्याध्यापक श्री म्हस्के यांनी मंडळाच्या या उपक्रमाबद्दल विद्यार्थ्यांच्या वतीने आनंद व आभार व्यक्त केले.

मंडळाच्या वतीने उमेश नारकर यांनी मंडळाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली व याचा फायदा विद्यार्थ्यांनि घ्यावा व उज्ज्वल भविष्य घडवावे असे आवाहन केले. नितीन नारकर यांनी विविध माहिती पूर्ण गोष्टी सांगून विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले.

या सर्व कार्यक्रमाचे उत्कृष्ठ नियोजन मयुर नारकर, ईशान नातू आदित्य देशपांडे यांनी केले. या कार्यक्रमास गुरुप्रसाद पावसकर, दीपक दीक्षित, तेजस चौकवाले तसेच युवा कार्यकर्ते उपस्थित होते. या सर्व कार्यक्रमा साठी शाळेच्या सर्व शिक्षक व सहकारी कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

सातारा – श्री मंगल मारुती मित्र मंडळ मंगळवार पेठ यांचे वतीने दरवर्षी प्रमाणे ’एक वही मोलाची ’ या उपक्रमा अंतर्गत गरजू व हुशार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात आले. (छाया- अतुल देशपांडे ,सातारा)


Back to top button
Don`t copy text!