स्थैर्य, फलटण, दि. ०१ : सध्या फलटण शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांमध्ये कोरोनाचे रूग्ण हे झपाट्याने वाढत चाललेले आहेत. फलटण शहरांप्रमाणेच तालुक्यातील कोरोनाचे हॉटस्पॉट असेलेली कोळकी, जाधववाडी, फरांदवाडी, विडणी, साखरवाडी, वाखरी, वाठार निंबाळकर, तरडगाव ही गावे सुध्दा कटेंटमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलेली आहेत, अशी माहिती फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी दिली.
४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे
फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.
संपर्क : 8888006611 (WhatsApp)
सध्या फलटण तालुक्यात कोरोनाचे रूग्ण हे मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहेत. कोरोनाचे हॉटस्पॉट असलेली कोळकी, जाधववाडी, फरांदवाडी, विडणी, साखरवाडी, वाखरी, वाठार निंबाळकर, तरडगाव ही गावे सुध्दा कटेंटमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आलेली आहेत. या गावामध्ये सुध्दा मेडीकल व दवाखाने वगळता इतर सर्व अत्यावश्यक सेवा सुध्दा बंद राहणार आहेत. त्या बाबतचे आदेश प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी पारित केलेले आहेत.
दि. २ मे ते ८ मे या गावातील अत्यावश्यक सेवेसह सर्व बाबी ह्या बंद राहणार आहेत. दुध, भाजीपाला व किराणा दुकाने यांना स्थानिक प्रशासनाच्या वतीने घरपोच करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे, असेही प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी स्पष्ट केले.