दैनिक स्थैर्य । दि. ०१ एप्रिल २०२३ । वडूज । प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रीदवाक्य असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने आपल्या सेवेतून ग्रामीण भागामध्ये एक आपुलकीचे नाते निर्माण केले आहे. खाजगी वाहतूक असूनही एस. टी. बसने विश्वासात जपली आहे. परंतु ,खटाव तालुक्यातील वडूज या ठिकाणी बस स्थानकात शनिवारी दुपारी रिकाम्या एस टी बस गाड्या आठ व ज्या ठिकाणी प्रवचन जायचे त्यांची पडेना एस.टी.ची गाठ अशी अवस्था पाहण्यास मिळली आहे.
खटाव तालुक्याचे ठिकाण असलेल्या वडूज एस टी बस स्थानक व मोठे एस.टी. आगार आहे. या आगारात एस.टी.ची देखभाल व दुरुस्ती चांगल्या पद्धतीने होते. परंतु, दोन वर्षाच्या कालावधीमध्ये कोरोनाच्या संकट आल्यामुळे नवीन वाहने मिळू शकले नाहीत. तर दुसऱ्या बाजूला जुनी बस वाहने भंगारला देण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्राचा विचार केला असता ४००० नवीन एस टी बस गाड्याची आवश्यकता आहे. गेल्या दोन वर्षात कोरोना संकट दूर झाले आहे. सध्या यंदाच्या वर्षी नवीन वाहनांच्या भार पडली आहे. त्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे प्रवाशांना ताटकळत राहावे लागत आहे. दुसऱ्या बाजूला वडूज बस स्थानकामध्ये एस.टी. कॅन्टीन बंद असल्याने वाहक व चालकांना जेवण करण्यासाठी आडोसा शोधावा लागत आहे. एकूणच संपूर्ण परिसरात गैरसोयीच्या आगार झाल्याचे दिसून येत आहे.
महिला माता-भगिनींना एस.टी. प्रवासामध्ये पन्नास टक्के सवलत मिळाल्यामुळे सत्ताधारी राजकीय पक्षाने स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी बस स्थानकात अभिनंदन फलक लावले तर दुसऱ्या बाजूला महिलांसाठी सुसज्ज स्वच्छतागृह नसल्याने महिलांची कुचंबणा होत आहे. याबाबत खरं म्हणजे विरोधी पक्षाने फलक लावून सत्ताधाऱ्यांचा निषेध करणे अपेक्षित होते. परंतु, सोशल मीडिया वर पोस्ट म्हणजेच सत्ताधाऱ्यांना विरोध करणे एवढीच कामगिरी विरोधी पक्ष सध्या तरी करत आहे.
वडूज एस टी आगारात विद्यार्थी — व्यवसाय निमित्त प्रवास करणारे प्रवासी व पन्नास टक्के सवलत असल्याने ज्येष्ठ नागरिक व महिलांची गर्दी वाढू लागलेली आहे. बस स्थानक प्रमुख म्हणून ज्यांच्याकडे कामगिरी आहे सदर अधिकारी या ठिकाणी हजर नसल्याचे प्रवाशांनी सांगितले. त्यामुळे वडाप व्यवसायिक अशा बस स्थानक प्रमुखांना धन्यवाद सुद्धा देत आहेत. शेवटी त्यांच्याही पोट पाण्याचा प्रश्न आहेच. असेही प्रवासी सांगत आहेत. प्रवाशांना ज्या ठिकाणी प्रवास करायचा आहे त्या मार्गावर बसेस सोडल्या तर बस स्थानकामध्ये गर्दी वाढणार नाही. हे कुणीही सांगेल पण , नियमावर बोट ठेवून व वेळेचे बंधन पाळून वरिष्ठांचे आदेश पाळले जातात. वाहक व चालक सर्व नियोजित मार्गावर एस टी बस धावली पाहिजे. यासाठी जागरूकतेने काम पाहतात. शेवटी एस.टी. महामंडळ म्हणजे सर्वसामान्य माणसांचे हक्काचे वाहन आहे. एस.टी .कर्मचाऱ्यांच्या मागण्या संदर्भात सर्वसामान्य प्रवाशांना पण, सहानभूती आहे. ही सहानभूती टिकवण्यासाठी ज्या मार्गावर जास्त प्रवासी त्या एस.टी.बस प्राधान्याने सोडवाव्यात अशी मागणी होत आहे. त्याकडे गांभीर्याने पाहून एस.टी. महामंडळाने वेळापत्रक योग्य ते बदल करावा कारण एसटी महामंडळ म्हणजे खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी जीवन वाहिनी आहे. ही जीवन वाहिनी अखंड अबाधित राहावी. अशी प्रार्थना प्रवासी वर्ग करत आहे.
सध्याचा काळ कठीण असून एस.टी. महामंडळाच्या सेवेतील कर्मचाऱ्यांनाही वेतन वाढ व त्यांच्या मागण्या सरकारने पूर्ण कराव्यात यासाठीही प्रवासी वर्गाने पाठिंबा दर्शवला आहे. बस स्थानक एस.टी. बसेस थांबून प्रवाशांचे गैरसोय करण्यापेक्षा ज्या मार्गावर जास्त प्रवासी त्याच मार्गावर त्वरित एस.टी. धावली तर लोकांची सेवा घडणार आहे. यासाठी आता दि. ६ एप्रिल रोजी राज्याचे विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांच्याकडे काही प्रवासी गाऱ्हाणी मांडणार असल्याचे बोलले जात आहे.