स्थैर्य, सातारा, दि.२८: येथील अर्कशाळेसमोरील फिटनेस फास्ट जिम लॉकडाऊनचे उल्लंघन करून सुरू असल्याचे निदर्शनास येताच शाहूपुरी पोलिसांनी कारवाई करून जिम मालकासह 8 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शाहुपूरी पोलीस पेट्रोलिंग करीत असताना अर्कशाळेसमोरील अर्कशाळानगर येथे असलेली फिटनेस फास्ट जिमची लाईट चालु असलेची दिसले. पोलिसांनी सदर ठिकाणी जावुन खात्री केली असता सदर ठिकाणी काही इसम जिम चालु ठेवुन जीममध्ये व्यायाम करीत असताना मिळुन आले. त्यांना त्यांची नावे विचारली असता त्यांनी आपली नावे 1) रोहन प्रकाश घोरपडे वय -38 वर्षे, रा .73 मंगळवार पेठ सातारा ( जीम मालक ) (2) यश सचिन शिंदे वय 21 वर्षे , रा.सुर्यपार्क रांगोळे कॉलनी शाहुपूरी सातारा ( 3 ) आदित्य जयंत काटे वय -26 वर्षे , रा .161 प्रतापगंजपेठ सातारा (4) गौरव प्रसाद माजगावकर वय -25 वर्षे , रा . 48 शुक्रवार पेठ सातारा (5) अजिंक्य रमेश अडसुळ वय -21 वर्षे , सुयोग कॉलनी शाहुपूरी सातारा (6) केतन चंद्रकांत शिंदे वय -24 वर्षे, रा .162 सोमवार पेठ सातारा (7) दर्शन अशोक देशपांडे वय -32 वर्षे, रा. 24 अंजली कॉलनी गेंडामाळ सातारा (8) विश्वजीत विजय माने वय -31 वर्षे , रा.प्लॉट नं 28 अंजली कॉलनी गेंडामाळ सातारा अशी सांगितली.
या सर्वांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करुन अर्कशाळेसमोरील अर्कशाळानगर , सातारा येथे असलेली फिटनेस फास्ट जिम चालु ठेवुन जीममध्ये व्यायाम करीत असताना मिळुन आले आहेत. याप्रकरणी त्यांच्यावर भादविसं कलम- 188,269,270 आपत्ती व्यवस्थापन अधि . 2005 कलम -51 ( ब ) महा . को . 19 अधि . 2012 में कलम 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.