स्थैर्य, सातारा, दि. 23 : होय……. आनंदाच्या क्षणाला ‘ईद’ म्हणतात. ईद म्हणजे खुशी. प्रेमासारखा ईद ही अडीच अक्षरी शब्द पण तेवढाच सशक्त. मानवी जीवनाचे सारे रहस्य यात सापडते. कोरोना या महाभयानक संकटाच्या साठ दिवसांच्या लॉक-डाऊन मुळे आनंदामध्ये खिळ पडलेली आहे.
आनंदाचे दिवस सर्व धर्मात आहेत. नांबात बदल असून पद्धतीतही कांहीसा फरक; पण आनंद म्हणजे आनंद. चेहऱ्यावरचे स्मित हास्य असो की हस्तांदोलन. आलिंगण किंवा गळा-भेट. यांतुन उच्चस्तराचा आनंद व्यक्त होतो. प्रिय व्यक्तिची भेट असो, की आई-वडिलांचा आशिर्वाद. हे आनंदाश्रूंनी पाणावलेले डोळे. मन हेलावून जाते. कारण कोरोनामुळे भारतात 3600 तर जगात तीन लाख चोंसष्ट हजार लोक दगावले आहेत.
सामाजिक जीवनात विशेषत: इस्लामिक जगात वर्षाला दोन मोठे सण म्हणजे ‘इंद-उल-फित्र’ आणि ‘ईदुझुहा’. शुक्रवार ही ईदचा दिवस. वर्षातील पन्नास वेळा मोहल्ल्यातील लोक जामा मस्जिद किंवा जुम्मा मस्जिद येथे एकत्र येऊन प्रार्थना करतात.
चंद्र मासावर आधारित इस्लामी कालगणनेनुसार इंद प्रत्येक मोसमात येते. यंदाची ईद कोरोनात सापडली आहे. कोरोना या जागतिक महामारीने सर्व श्रद्धाळूंचा आनंद व सुखी जीवन हिरावुन घेतलेला आहे.
चांद मुबारक – इंद मुबारक
येत्या रविवारी किंवा सोमवारी ईद होईल. जर शनिवारी चंद्र दिसला, तर रविवारी ईद साजरी करण्यात येईल. तेंव्हा शब्द-सुमनांनी सर्वांना रमजान-ईंदच्या शुभेच्छा…….! कोरोना-मुक्तिसाठी सर्वांनी क्षमा-याचना, दुवा करावी.
पवित्र रमजान महिना हा साऱ्या महिन्यांचा सरदार मानला जातो. या महिन्यातील रोजे म्हणजे उपवास. सूयौदयाच्या थोडे आधीपासून ते सूर्यास्तापर्यंत जेवण-सेवन व संभोगापासून दूर राहणे. कुराण पठण, विशेष नमाज तरावीह, दान, फितरा यांतून तसेच ‘लैलतुल कदर’ म्हणजे ‘बड़ी रात’. कोजागिरी समान या रात्रीत प्रार्थना हजार महिन्यांपेक्षा श्रेष्ठ.
हिजरी सन 1441 चा रमजान महिन्याचा हा शेवटचा दिवस. पवित्र रमजान यथाशक्तिप्रमाणे पार पाळणारे अल्लाह कडे दया, याचना व प्रार्थना करुन रोजे, नमाज, तिलावत-ए-कुराण, तरावीह, फितरा, व दान आदी कबूल होवो, म्हणून ईदच्या दिवशी सामुहिकरित्या प्रार्थना करतात. कोरोना बरोबर चक्रोवादळ संकट मोचनासाठी देखील दुवा व्हावी.
अल्लाह साऱ्या विश्वाचा, केवळ मुसलमानांचाच नव्हे. प्रेषित मोहम्मद हे साऱ्या विश्वासाठी मुस्लिमांसाठी सर्वांसाठीच कृपाळू व दयाळू, केवळ मुस्लिमांसाठी नव्हे. तसेच कुरआनही सर्वांसाठीच आहे. गरज आहे समजून घेण्याची.
युनूस आलम सिद्दीकी, सेवा निवृत्त माहिती अधिकारी.