दैनिक स्थैर्य | दि. ९ एप्रिल २०२३ | फलटण | सरडे, तालुका फलटण गावच्या हद्दीत सरडे ते राजाळे जाणार्या रस्त्यावर फलटण ग्रामीण पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात एका आयशर टेम्पोमध्ये व पिकअपमध्ये सुमारे ४९ गाई, वासरे व एक म्हैशीचे रेडकू कत्तलीच्या इराद्याने दाटीवाटीने, विना चारा, पाणी घेऊन जाताना ताब्यात घेतली आहेत. यावेळी पोलिसांनी सुमारे २७ लाख ९० हजार रुपये किमतीची गाई, वासरे व टेम्पो जप्त केला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी तिघांवर प्राण्यांचा छळ केल्याचा गुन्हा दाखल केला असून साकिब जावेद कुरेशी (वय २०, राहणार देवळे इस्टेट, तालुका बारामती, जिल्हा पुणे), जमीर सेफान शेख (राहणार मेकळी, तालुका बारामती, जिल्हा पुणे) व पिकअप टेम्पोचालक अमीर हाजी शेख (वय २०, राहणार निरावागज, तालुका बारामती, जिल्हा पुणे) यांना अटक केली आहे.
याबाबतची पोलिसांनी दिलेली अधिक माहिती, आज दुपारी १.३० वाजता सरडे तालुका, फलटण गावच्या हद्दीत सरडे ते राजाळे जाणारे रोडवर प्राथमिक शाळेचे जवळ आयशर टेम्पो क्रमांक (एमएच-४५-०९७०) वरील चालक साकीब जावेद कुरेशी (वय २०, राहणार देवळे इस्टेट, तालुका बारामती, जिल्हा पुणे) त्यांच्यासोबत असले बालक व एक पिकअप (क्र. एमएच-४२-एम-४२७५) वरील चालक अमर हाजी शेख (वय २०, राहणार निरा वाघस, तालुका बारामती) यांनी मिळून एकूण ४१ जर्सी गाईंची लहान वासरे, एक म्हशीचे रेडकू, चार गाई, तीन मृत जर्सी गाईंची लहान वासरे यांना चारा, पाण्याची सोय न करता कत्तल करण्याच्या इराद्याने कमी जागेमध्ये निर्दयीपणे दाटीवाटीने भरून घेऊन जात असताना मिळून आले.
यावेळी पोलिसांनी १५ लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो, ८२ हजार रुपये किमतीची ४१ जर्सी गाईंची लहान जिवंत वासरे (वय अंदाजे १ ते १५ दिवसांची), २ हजार रुपये किमतीचे एक म्हशीचे रेडकू (वय अंदाजे १ ते १५दिवसांची), १ लाख रुपये किमतीची दोन गाई (वय अंदाजे ५ ते ६ वर्षांची), ६ हजार रुपये किमतीची ३ जर्सी गाईची वासरे (वय अंदाजे एक दिवस ते १५ दिवस मृत अवस्थेत असलेली, सुमारे १० लाख रुपये किमतीची पिकअप, १ लाख रुपये किमतीच्या दोन गाई (अंदाजे पाच ते सहा वर्षाची, त्यातील एका गाईचा पाठीमागील डावा पाय मोडलेला) असा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल ऋषिकेश दाजी राम खरात यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सहाय्यक पोलीस फौजदार सूर्यवंशी अधिक तपास करत आहेत.