
स्थैर्य, फलटण, दि. १४ : बदामी रंगाच्या आयशर प्रो कंपनीचा चार चाकी टेम्पो क्र. एमएच ५०/८३३३ या गाडीत गोवंशीय जातीची अंदाजे एक ते दोन महिने वयाची बारा जर्सी गायची वासरे कत्तल करण्यासाठी दाटीवाटीने डांबून ठेवलेली मिळून आली म्हणून तौफिक इम्तियाज कुरेशी रा. कुरेशी नगर, फलटण यांच्यावर महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम व महाराष्ट्र पशु छळ अधिनीयमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, अशी माहिती फलटण शहर पोलीस स्टेशनचे निरिक्षक भारत किंद्रे यांनी दिली.
या बाबत फलटण शहर पोलीस स्टेशनकडुन मिळालेली माहिती अशी की, दि. १४ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजुन १५ मिनिटांच्या सुमारास आरोपी तौफिक इम्तियाज कुरेशी, रा. कुरेशी नगर, फलटण, ता. फलटण हा कुरेशी नगर, फलटण येथे स्वतःच्या फायद्यासाठी बदामी रंगाच्या आयशर टेम्पो मध्ये १२ जर्सी गायीची वासरे डांबून जात असल्याचा आढळून आला. पोलीस आलेल्यांची चाहूल लागताच आरोपीला पळुन जाण्यामध्ये यश आलेले आहे. याबाबतची फिर्याद पोलीस हेड कॉन्स्टेबल महादेव पिसे यांनी दिली तर पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सोनवलकर करत आहेत.