स्थैर्य,सातारा, दि ५ : आरक्षणामुळे माणसे दूरावली जात आहेत. खरं तर गुणवत्तेलाच प्राधान्य दिले पाहिजे असे माझे वैयक्तिक मत असल्याचे खासदार उदयनराजे भाेसले यांनी आज (गुरुवार) येथे व्यक्त केले. त्यामुळेच मी सातारा पालिकेत गुणवत्तेलाच महत्व देत आलाे असून जाती धर्म बाजूला ठेवल्याचे खासदार भाेसलेंनी नमूद केले.
सातारा पालिकेच्या उपाध्यक्षपदी मनाेज शेंडे यांची बिनविराेध झाल्यानंतर खासदार उदयनराजे भाेसले हे पालिका कार्यालयात आले. तेथे त्यांनी उपाध्यक्ष मनाेज शेंडे यांचे अभिनंदन केले. त्यावेळी माजी उपाध्यक्ष किशाेर शिंदे, ज्येष्ठ नगरसेवक राजू भाेसले, नगरसेविका सुजाता राजेमहाडीक, स्मिता घाेडके आदी उपस्थित हाेते. त्यानंतर पत्रकारांनी उदयनराजेंना मराठा आरक्षणासाठी विषयावर छेडले. त्यावर उदयनराजेंनी मी सर्वधर्म, जाती समाज समभाव मानताे.
राज्यातील मराठा समाजातील संघटनांमध्ये इगाे प्राॅब्लेम असल्याचे उदयनराजेंनी नमूद केले. ते म्हणाले, मी मराठा म्हणून कधी मला संबाेधिले नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वधर्मभावाची शिकवण दिली. तीच आजही अंमलात आणली आहे. माझ्याकडे सर्व जाती धर्माचे लाेक कार्यरत आहेत. लहानपणी गाेट्या, विटया दांडू खेळायचाे तेव्हा तुम्हा पहायचा का हा इथला ताे तिथला… या आरक्षणामुळे लाेक एकमेकांशी बाेलण्याचे बंद झाले. कूठला हा दृष्टीकाेन. मी मनापासून बाेलताे एवढचं.