जिल्ह्यातील विविध शाळेत शैक्षणिक सहलींसाठी धांदल

विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार सहलीची ठिकाणे निश्चित


स्थैर्य, सातारा, दि. 4 डिसेंबर : सातारा शहरासह परिसरातील शाळांमध्ये गेल्या काही दिवसांपासून क्रीडा स्पर्धा आणि इतर उपक्रमांचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धा तसेच इतर उपक्रम संपत आल्याने शाळास्तरावर शैक्षणिक सहलींचे आयोजन करण्यासाठीची धांदल सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार क सहलीची ठिकाणे व अंतर निश्चित बल करण्यावर शाळा व्यवस्थापनांचा डॉ. जोर आहे.

गेल्या काही दिवसांपासून र शहरासह परिसरातील शाळांचे वातावरण क्रीडा स्पर्धांमुळे उत्साही च बनले आहे. विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करत त्यामध्ये – सर्वच विद्यार्थ्यांचा सहभाग राहावा, यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आग्रही आहेत. या क्रीडा स्पर्धांमुळे शाळा परिसरासह लगतची मैदाने गजबजून गेली होती. अनेक शाळांमधील क्रीडा स्पर्धांचे कामकाज संपत आले असून, अनेक ठिकाणी आयोजनासाठीचा स्नेहसंमेलन आराखडा तयार करण्यात येत आहे. क्रीडा स्पर्धा आणि स्नेहसंमेलनाच्या मध्यंतरी शैक्षणिक सहलींचे नियोजन अनेक शाळांत सुरू झाले आहे.

शाळेतील विद्यार्थ्यांचा वयोगट लक्षात घेता त्यानुसार सहलीचे नियोजन करण्यात येत आहे. लहान विद्यार्थी लक्षात घेऊन शहरालगतचे साखर कारखाने तसेच इतर ठिकाणी त्यांना सहलीसाठी नेण्याचा विचार शाळा व्यवस्थापनाकडून सुरू आहे.अनेक शाळांत मोठ्या विद्यार्थी गटांसाठी दोन दिवसीय मुक्कामी शैक्षणिक सहल आयोजित करण्यात येत असून, यासाठी लगतच्या जिल्ह्यातील प्रेक्षणीय आणि ऐतिहासिक स्थळांचा समावेश करण्यात येत आहे. या सहलीसाठी सुसज्ज आणि अद्ययावत बस आवश्यक असल्याने अनेक शाळांनी त्यासाठीचा एसटी महामंडळाशी संपर्क साधत पत्रव्यवहार सुरू केल्याचे दिसून येत आहे.


Back to top button
Don`t copy text!