शिक्षणाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजला भेट

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now



स्थैर्य, फलटण : इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया संदर्भात सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी राजेंद्र क्षीरसागर फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज फलटण येथे भेट दिली. 

सदर भेटी दरम्यान त्यांना विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेच्या दरम्यान सोशल डिस्टन्स, सर्व प्रवेश प्रक्रिया मधील शिक्षक तसेच प्रवेश घेणार्‍या विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपल्या तोंडावर मास्क बांधलेले आढळले .त्याचप्रमाणे येणार्‍या विद्यार्थ्यांचे व संबंधित पालकांचे इन्फ्रारेड थरमोमीटर ने तापमान मोजत असलेले दिसून आले. तसेच विद्यार्थ्यांना रांगेत उभारण्यासाठी सर्कल करण्यात आले होते. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी वेगळी व्यवस्था केलेली आहे हे त्यांच्या निदर्शनास आले.

 प्रवेशासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना सॅनिटायझर देण्यात आले. माननीय शिक्षणाधिकार्‍यांनी इयत्ता 11वी प्रवेश प्रक्रिया ची संपूर्ण माहिती प्राचार्य खुरंगे यांनी तसेच जुनिअर विभागाचे उपप्राचार्य फडतरे यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली. यावेळी तुषार नाईक-निंबाळकर हे उपस्थित होते. 

29 ऑगस्ट हा मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस असतो संपूर्ण भारतामध्ये हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त यावेळी शिक्षणाधिकारी क्षीरसागर यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मुधोजी हायस्कूलचे क्रीडा शिक्षक सचिन धुमाळ यांनी मेजर ध्यानचंद यांच्या विषयी माहिती सांगितली व 29 ऑगस्ट हा दिवस क्रीडा दिन म्हणून का साजरा केला जातो याची माहिती दिली.

 

यावेळी मुधोजी स्कूलचे प्राचार्य खुरंगे, ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य फडतरे, किमान कौशल्य विभागाचे प्रमुख रणसिंग, सकाळ विभागाचे प्रमुख खुंटे तसेच तुषार नाईक निंबाळकर यांनी ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन केले. 

याप्रसंगी मुधोजी हायस्कूलचे क्रीडाशिक्षक खुरंगे, नाळे, सुळ, जाधव, कुमारी धनश्री क्षीरसागर, वरिष्ठ शिक्षक ननावरे, वाघ, सौ.दाते, सपाट, भोईटे, सूर्यवंशी व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे उपस्थित होते. प्रारंभी प्राचार्य खुरंगे यांनी क्षीरसागर यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन प्रशालेच्या वतीने स्वागत केले. 

मुधोजी हायस्कूल, फलटण येथे मेजर ध्यानचंद यांना जयंतीनिमित्त अभिवादन करताना शिक्षणाधिकारी राजेंद्र क्षीरसागर. समवेत प्राचार्य खुरंगे, तुषार नाईक निंबाळकर व विद्यालयाचे शिक्षक वृंद.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!