शिक्षण विस्तार अधिकारी राधेश्याम बागाव यांचे निधन


स्थैर्य, गोखळी, दि. ०७ ऑगस्ट : गोखळी (ता. फलटण) येथील रहिवासी आणि शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले राधेश्याम मारुती बागाव (गुरुजी) यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

राधेश्याम बागाव यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात उपशिक्षक म्हणून आपल्या सेवेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी गोखळी, आदर्की खुर्द, पंचबिघा व पवारवाडी येथे मुख्याध्यापक म्हणून काम पाहिले. पुढे त्यांना पाटण तालुक्यात शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली, जिथे त्यांनी सहा वर्षे काम करून ते सेवानिवृत्त झाले होते.

त्यांच्यावर गोखळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्ययात्रेत सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर सहभागी झाले होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक विवाहित मुलगी, दोन विवाहित मुलगे आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.


Back to top button
Don`t copy text!