दैनिक स्थैर्य । दि. ०८ ऑगस्ट २०२२ । पुणे । दि. 7 ऑगस्ट 2022 रोजी शिक्षणविवेकच्या 10 व्या वर्धापनदिनानिमित्त घेण्यात आलेल्या काव्य अभिवाचन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ, तसेच शिक्षणविवेकच्या अंकाचे प्रकाशन मा.स. गोळवळकर प्रशालेच्या गणेश सभागृहात संपन्न झाले. याप्रसंगी बोलताना डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे नियामक मंडळ अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांनी अशा स्पर्धांमधून मुलांचा विकास होत जातो आणि त्यातूनच नवीन पिढी तयार होत असते, असे प्रतिपादन केले. त्याच बरोबर शिक्षणविवेकसारख्या शिक्षणव्यवस्थेला पूरक असणाऱ्या संस्थांमधून होणारे कामही तितकेच महत्त्वाचे आणि उल्लेखनीय आहे, असे उद्गार त्यांनी काढले. तर बालसाहित्यकार राजीव तांबे यांनीही वाचनाचे महत्त्व पटवून देत असताना पालकांनी मुलांच्या वाचन प्रक्रियेत सहभागी झाले पाहिजे, असे मत मांडले. तसेच विंदा करंदीकर यांच्या ‘स्टूल आणि खूर्ची’ या कवितेचे अभिवाचन त्यांनी केले.
शिक्षणविवेकच्या 10 व्या वर्धापनदिनानिमित्त तिसरी ते दहावी, युवागट, पालक आणि शिक्षक गट यांच्यासाठी काव्य अभिवाचन स्पर्धा दि. 25 जुलै ते 5 ऑगस्ट या काळात घेण्यात आली. या स्पर्धेत विविध महाविद्यालये आणि शाळांमधले विद्यार्थी-शिक्षक आणि पालक यांचे 343 गट सहभागी झाले होते. एका गटात तीन स्पर्धक होते. तब्बल 15 दिवस चाललेल्या या स्पर्धेसाठी सहभागी गटांनी, शांताबाई शेळके, विंदा करंदीकर, स्वा.वीर सावरकर, वसंत बापट आणि कुसुमाग्रज यांच्या कविता सादर केल्या. यातील सर्व गटांनी विषयाधारित कविता निवडून, त्यावरच्या संहिता तयार करून त्यावरची सादरीकरणे केली. त्यातून विजेत्या गटांना बक्षिसे देण्यात आली, तसेच सर्वोत्कृष्ट सादरीकरणाची बक्षिसेही देण्यात आली.
शिक्षक गट
प्रथम क्रमांक – आरती निमगावकर, अंकुर शुक्ल, अनुराधा वाघ,
डे.ए.सो. फर्ग्युसन कॉलेज, पुणे
द्वितीय क्रमांक – स्वाती कानडे, कीर्ती गंधे, वैशाली बोरनारकर
व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल, नर्हे
तृतीय क्रमांक – पुष्पलता लाड, मनीषा बाजारे, मुग्धा सामदेकर
रेणुका स्वरुप प्रशाला, पुणे
उत्तेजनार्थ 1 – संताजी चव्हाण, सुचिता पवार, प्रेमला बराटे
महिलाश्रम हायस्कूल, कर्वेनगर, पुणे
उत्तेजनार्थ 2 – प्रज्ञा करडखेडकर, सुलोचना शिंदे, पल्लवी पारुंडेकर,
अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स, पुणे
पालक गट
प्रथम क्रमांक – साईरमा शेटे, वर्षा न्यायाधीश, मृणालिनी दुसाने
द्वितीय क्रमांक – दीपश्री देशपांडे, गिरिजा देशमुख, आरती देशपांडे,
डी.ई.एस. प्री-प्रायमरी स्कूल, पुणे
तृतीय क्रमांक – माधवी जोगळेकर, प्रज्ञा खाडिलकर, मयुरी रोकडे,
एस.एन.डी.टी. कॉलेज, पुणे
उत्तेजनार्थ 1 – पल्लवी पाठक, ज्योती देशपांडे, नंदिनी देव,
भावे हायस्कूल
उत्तेजनार्थ 2 – कुंजल गंधे, नंदिनी पावसकर, श्रावणी पेंडसे
रेणुका स्वरुप प्रशाला, सदाशिव पेठ, पुणे
युवा गट
प्रथम क्रमांक – ईशा महल्ले, श्रिया बर्वे, राधा यादवाडकर
द्वितीय क्रमांक – प्रांजल मराठे, चैत्राली तुळजापुरकर, मैत्रेयी संकुले
9 वी-10 वी गट
प्रथम क्रमांक – रिधिमा बापट, सौम्या पटवर्धन, मृण्मयी वैद्य
एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूल, पुणे
द्वितीय क्रमांक – आर्यन पंढरपुरे, मल्हार कुलकर्णी, धवल खैरनार, भावे हायस्कूल, पुणे
तृतीय क्रमांक – श्रुती मोरे, आर्या चव्हाण, समृद्धी शिंदे
महिलाश्रम हायस्कूल, कर्वेनगर, पुणे
उत्तेजनार्थ 1 – राधा जोशी, आर्या वैद्य, गाथा राऊत
अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स, पुणे
उत्तेजनार्थ 2 – प्रज्ञा माने, वेदिका कन्नव, आर्या गोखले
व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल, पुणे
विशेष प्रयोगशील – ईशान जबडे, सौमित्र सबनीस, स्वप्निल कुंभार, न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, पुणे
7 वी-8 वी गट
प्रथम क्रमांक – दिशा सपाकाळ, शार्दूल संत, अग्रणी साठे
मा.स. गोळवलकर गुरुजी विद्यालय, पुणे
द्वितीय क्रमांक – चैतन्य पुरोहित, पुरुषोत्तम इनामदार, पूर्वा शहा
ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी, पुणे
तृतीय क्रमांक – शर्व देशपांडे, रेवा कुलकर्णी, माही मेहता
एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूल, पुणे
उत्तेजनार्थ 1 – सनत देशपांडे, तनिष्का दळवी, संकष्टी पांगारे
शिशुविहार प्राथमिक शाळा, एरंडवणे
उत्तेजनार्थ 2 – श्रेया गाढवे, शालिनी बिडकर, प्रीती पाटील
महिलाश्रम हायस्कूल, कर्वेनगर, पुणे
5 वी-6 वी गट
प्रथम क्रमांक – रमा निमगावकर, गिरिजा पुरंदरे, सई पडाळकर
न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, पुणे
द्वितीय क्रमांक – आरोही देशपांडे, ओम कळके, आर्यन हसबे
ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी, पुणे
तृतीय क्रमांक – अवधूत भिडे, अथर्व यावलकर, तेजस कवितके
न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, पुणे
उत्तेजनार्थ 1 – ईश्वरी निकम, अपूर्वा खराडे, अपूर्वा कुडित्रे
विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल, पिंपरी
उत्तेजनार्थ 2 – आदिती गोसावी, हिरण्यमयी सप्रे, सिद्धी वाघोले
ज्ञानप्रबोधिनी प्रशाला, पुणे
3 री-4 थी गट
प्रथम क्रमांक – मैत्रेयी सोनपेठकर, स्वरा राजे, भार्गवी हनमघर
ज्ञानगंगा इंग्लिश मीडियम स्कूल, पुणे
द्वितीय क्रमांक (विभागून) – सिद्धांत पटवे, अन्वी असोदेकर, स्वरा सांगळे
नवीन मराठी शाळा, पुणे
द्वितीय क्रमांक (विभागून) – राही पोहनेरकर, सई रोकडे, पौरवी कुलकर्णी
नवीन मराठी शाळा, पुणे
तृतीय क्रमांक – संहिता फडके, कणाद सावरकर, शौनक पोंक्षे
मा.स. गोळवलकर गुरुजी विद्यालय, पुणे
उत्तेजनार्थ 1 – अबीर विलणकर, अन्विका देसाई, विहान टिळेकर
विबग्योर रूट्स अँड राईज स्कूल, पिंपळे सौदागर
उत्तेजनार्थ 2 – अवनी कानकुंडे, आर्या दहीभाते, अनुष्का कांबळे
शिशुविहार प्राथमिक शाळा, एरंडवणा
शिक्षक गट
सर्वोत्कृष्ट सादरीकरण 1 (वैयक्तीक) –
मानसी सोनपेठकर, ज्ञानगंगा इंग्लिश मीडियम स्कूल, पुणे
सर्वोत्कृष्ट सादरीकरण 2 (वैयक्तीक) –
पूजा अवचट, न्या. रानडे बालक मंदिर, पुणे
पालक गट
सर्वोत्कृष्ट सादरीकरण 1 (वैयक्तीक) –
अश्विनी पंढरपुरे, भावे हायस्कूल, पुणे
सर्वोत्कृष्ट सादरीकरण 2 (वैयक्तीक) –
विजया वेल्हाळ
9 वी-10 वी गट
सर्वोत्कृष्ट सादरीकरण 1 (वैयक्तीक) –
इशिका कुलकर्णी, न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, पुणे
सर्वोत्कृष्ट सादरीकरण 2 (वैयक्तीक) –
श्रेयस सगर, भावे हायस्कूल, पुणे
7 वी-8 वी गट
सर्वोत्कृष्ट सादरीकरण 1 (वैयक्तीक) –
स्वानंदी सांगवीकर, व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल, पुणे
सर्वोत्कृष्ट सादरीकरण 2 (वैयक्तीक) –
श्रावणी कोरवी, रेणुका स्वरुप प्रशाला, पुणे
5 वी-6 वी गट
सर्वोत्कृष्ट सादरीकरण 1 (वैयक्तीक) –
सावित्री सोमण, न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, पुणे
सर्वोत्कृष्ट सादरीकरण 2 (वैयक्तीक) –
प्रणिती साळुंखे, ज्ञानगंगा इंग्लिश मीडियम स्कूल, पुणे
3 री-4 थी गट
सर्वोत्कृष्ट सादरीकरण 1 (वैयक्तीक) –
सार्थक कुलकर्णी, मा.स. गोळवलकर गुरुजी विद्यालय, पुणे
सर्वोत्कृष्ट सादरीकरण 2 (वैयक्तीक) –
आराध्या काटे, शिशुविहार प्राथमिक शाळा, कर्वेनगर
या कार्यक्रमाच्या वेळी व्यासपीठावर शिक्षणतज्ज्ञ डॉ. शरद कुंटे, बालसाहित्यकार राजीव तांबे, पत्रकार डॉ. नयना कासखेडीकर, शिक्षणविवेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणविवेकच्या कार्यकारी संपादक डॉ. अर्चना कुडतरकर यांनी केले, तर सूत्रसंचालन ज्योती पोकळे यांनी केले.