ईडीचा समन्स:’चौकशीची ही पाचवी वेळ, आता सध्या ईडीला सामोरा जाणार आहे; सीडीचे नंतर बघूया’ – एकनाथ खडसे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, जळगाव, दि.२६: भोसरी येथील भूखंडाच्या व्यवहारासंदर्भात सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीने राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंना नोटीस बजावली आहे. या संदर्भात बोलताना खडसे म्हणाले की, ही नोटीस मला आज मिळाली. बुधवारी मला मुंबईमध्ये चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. ईडी चौकशीला मी सामोरा जाणार आहे. ईडीला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची माहिती खडसेंनी दिली. तसेच सध्या ईडीला सामोर जाणार, सीडीचे नंतर बघूया असा टोलाही खडसेंनी लगावला आहे.

एकनाथ खडसे हे आज वैयक्तिक कामानिमित्त जळगावमध्ये आलेले होते. त्यांनी आपल्या मुक्ताई निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ‘यापुर्वी लाचलूचपत प्रतिबंधक विभाग पुणे, लाचलूचपत प्रतिबंधक विभाग नाशिक, प्राप्तिकर विभाग यांनी चौकशी केलेली आहे. त्यावेळी मी सर्व कागदपत्रांसह हजर राहिलो होतो. आता देखील ईडीला मी सर्वतोपरी मदत करणार आहे. भोसरीच्या भूखंड प्रकरणी ही चौकशी होत आहे. आतापर्यंत चारवेळा या संदर्भात चौकशी झालेली असून, ही पाचवी वेळ आहे. आता सध्या ईडीला सामोरा जाणार आहे, सीडीचं नंतर बघूया!’ असा टोलाही खडसेंनी लगावला आहे.

हा भूखंड मी नाही माझ्या पत्नीने खरेदी केलाय
एकनाथ खडसे पुढे बोलताना म्हणाले की, ‘भोसरीचा भूखंड मी खरेदी केलेला नाही तर माझ्या पत्नाने खरेदी केला आहे. त्या ठिकाणचा व्यवहार हा रेडीरेकनरच्या दराप्रमाणे 5 कोटींचा आहे, या प्रकरणी चौकशी केली जात आहे. आणखी चौकशी करण्याचा ईडीला अधिकार आहे. त्यामुळे ईडीकडून जी काही सूचना येईल त्याप्रमाणे मी मदत करण्यास तयार आहे.


Back to top button
Don`t copy text!