DHFL घोटाळ्यात ED ची कारवाई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांची मुलगी आणि जावयाची संपत्ती जप्त

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि. १५: दिवाळखोरीचा सामना करत असलेली दीवान हाउसिंग फायनांस लिमिटेड (DHFL)चे प्रमोटर्स कपिल आणि धीरज वधावानशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात माजी केंद्रीय आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांची मुलगी प्रिती राज श्रॉफ आणि जावई राज श्रॉफ यांची कमर्शियल संपत्ती ED कडून जप्त करण्यात आली आहे.

DHFL अनेक घोटाळ्यात सामील

सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँके (PNB) ने दीवान हाउसिंग फायनांस लि. (DHFL)ला दिलेल्या 3,688.58 कोटी रुपयांच्या कर्जाला फ्रॉड घोषित करण्यात आले आहे. ही तिच कंपनी आहे, ज्याची YES बँकेतील कर्ज आणि घोटाळ्याप्रकरणी चौकशी सुरू आहे. कंपनीचे प्रमोटर वधावन बंधु पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि त्यांची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने संलग्न केली आहे. YES बँकेतील घोटाळ्याप्रकरणी ED ने बँकेची माजी प्रमुख राणा कपूर आणि DHFL चे प्रमोटर्स कपिल वधावन आणि धीरज वधावनची 2400 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.

नोव्हेंबर 2020 मध्ये दिवाळखोरी प्रक्रिया मंजूर झाली

नोव्हेंबर 2020 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने दिवाळखोरी प्रक्रियेसाठी डीएचएफएलला नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल (एनसीएलटी) कडे सोपविले. DHFL पहिली आर्थिक कंपनी आहे, ज्याला RBI ने कलम 227 अंतर्गत विशेष अधिकारांचा वापर करत NCLT मध्ये पाठवले आहे.


Back to top button
Don`t copy text!