“कोरोनाची दुसरी लाट, इकॉनॉमी ची लागली आहे पुरती वाट ! वाढू देऊ नका तुमची घबराट, रहा सकारात्मक आणि वाढवा आपली कल्पनाशक्ती अफाट!!

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि.२१: मागच्या मार्च पासून कोरोनाचा कहर चालूच आहे. पहिल्या लाटे मध्ये लॉकडाऊन ३ महिने चालले आणि मग टप्याटप्यानि अनलॉक सुरू झाले. त्यावेळी बरेच व्यवसाय ठप्प झाले होते पण तो पहिलाच अनुभव असल्यामुळे ते हळूहळू सावरत होते. जानेवारी- फेब्रुवारी मध्ये आता कुठे जरा गाडी रुळावर येत होती आणि तेंव्हाच दुसऱ्या लाटेला सुरुवात झाली आणि परत मार्च मध्ये लॉक-डाऊन जाहीर केले गेले. अर्थात तो पर्याय अनिवार्य होता कारण लाटच तशी महाभयंकर होती.

दुसऱ्या लाटे मध्ये वेगळे काय होते :-

१. घरातील जवळपास सर्वच माणसे पोसिटीव्ह आली आणि त्यातील बहुतांश लोकांना ऍडमिट करावे लागले . ज्यांचा mediclaim insuarance होता त्यांना फार आर्थिक ताण आला नाही पण ज्यांचा न्हवता त्यांची मात्र अतिशय आर्थिक ओढाताण झाली.
मानसिक ताण आणि भीती ही वेगळीच होती. आणि दुष्काळात तेराव्वा आल्यासारखा घरातील काही लोक दगावले सुद्धा.

२. काही आस्थापने जी पहिल्या लाटे मधून सावरण्याचा प्रयत्न करत होती ती परत बंद झाल्यामुळे प्रचंड आर्थिक मंदी आली . काही multinational ग्रुप ला आपली सर्व हॉटेल्स बेमुदत काळासाठी बंद करावी लागली आहेत. विमान कंपन्यांचे पण तसेच झाले आहे . S T महामंडळ सुद्धा प्रचंड तोट्यात गेले आहे.

३. बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या किन्वा नोकऱ्या राहिल्या तर पगार अर्धाच मिळाला कारण जिथे ते काम करत होते तिथले income च निम्यापेक्षा जास्त टाक्यांनी घटले.

४. घरात बसून मग ते नोकरी गेल्या मुळे असो किन्वा work फ्रॉम home असो, शारीरिक आणि मानसिक आजार खूप वाढिला लागले आहेत.

५. तिसरी लाट येऊ घातली आहे असे म्हणतात . त्यामध्ये लहान मुले जास्त affect होणार आहेत असेही भाकीत आहे. आता ही कधी येणार हे कोणालाच
नक्की माहीत नाही पण मनात एक भीती मात्र दाटली आहे .

६. लसीकरण पाहिजे होते त्या वेगाने झालेले नाही. किंबहुना १८ ते ४५ या वयोगटाचे लसीकरण अजून 2 % सुद्धा झालेले नाही .आणि याच वयोगटातील लोक तिसऱ्या लाटे मध्ये जास्त इंफेक्ट होणार आहेत असे भाकीत आहे.

आता हा तिढा सोडवायचा कसा ? तुम्ही म्हणाल नुसतेच प्रॉब्लेम सांगताय आणि मनातील भीती वाढवताय !
SOLUTION सांगा .
तर हा तिढा सोडवायचा असेल तर आता आपण काय केले पाहिजे ते बघुयात :-

१) सकारात्मकता ही आपली पहिली ढाल आहे . आपण मानसिक दृष्ट्या पहिल्यांदा सक्षम झाले पाहिजे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ज्या जोमाने आपण आपले आयुष्य सुरू करतो आणि व्यवसाय सुरू करतो तसाचं परत सुरू करा. यावेळेस तुमचा पाठीमागे इतक्या वर्षाचा गाढा अनुभव मात्र नक्कीच आहे हे लक्षात असुद्या.

२. मिळेल तेव्हा लसीकरण बिनधास्त करून घ्या . तिसऱ्या लाटे पासून वाचायचे असेल तर लसीकरण करून घेणे अनिवार्यच आहे .

३. दुसरी लाट जरी कमी झाली असली तरी त्रिसूत्री ही पाळलीच पाहिजे , त्यातून आता आपली अजून काही वर्षे तरी सुटका नाही असे दिसते आहे.

४.RtPCR पोसिटीव्ह आलेले पण ज्यांना काहीही त्रास नाही अशा लोकांनी १५ दिवस विलगिकरण कक्षा मध्ये राहणे अनिवार्य आहे . ग्रामीण भागात कोरोना झपाट्याने वाढण्याचे कारण प्रामुख्याने हेच होते की पोसिटीव्ह patients २ ते ३ दिवसांनी बाहेर राज-रोज पणे फिरत होते आणि ते संपर्कात येणाऱ्या बऱ्याच जणांना कोरोनाचा प्रसाद देत होते .

५.प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जपून गरजूंना मदतीचा हात पुढे केला पाहिजे . आपला समाज परत नव्याने उभा केला पाहिजे आणि तो नक्कीच राहील यात काही शंकाच नाही .

६. आपली कल्पना-शक्ती वाढवा , जी गोष्ट आपल्याला साध्य करायची आहे ती करण्याचा मनापासून निश्चय करा आणि ती साध्य करण्यासाठी पुढचे पाऊल उचला . आपल्या आयुष्यात अशा बऱ्याच लाटा येतील आणि जातील पण निधड्या छातीने त्याचा सामना करण्याचे बळ आणि क्षमता आपल्या प्रत्येकात आहे आणि त्याचा विकास आता प्रत्येकाने करण्याची वेळ आली आहे.

– डॉ प्रसाद जोशी,
अस्थीरोग शल्य – चिकित्सक,
जोशी हॉस्पिटल प्रा. लि ., फलटण .
फलटण.


Back to top button
Don`t copy text!