दैनिक स्थैर्य | दि. ०७ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
आर्थिकद़ृष्ट्या दुर्बल कलाकारांनी जे फक्त आपल्या कलेवर गुजराण करीत आहेत अशा वैयक्तिक कलाकारांनी शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी विहीत नमुन्यात सातारा तहसील कार्यालयाकडे अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या योजनेनुसार जे कलाकार राज्यात १५ वर्षांपासून फक्त कलेवर गुजराण करीत आहेत व जे ज्यांचे वार्षिक उत्पन्न ५० हजारांपर्यंत आहे, असे कलाकार या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरणार आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या वृद्ध कलाकार मानधन योजनेतून मानधन घेणारे कलाकार, इतर वैयक्तिक शासकीय अर्थसहाय्याच्या योजनेचा लाभ घेणार्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
लाभार्थ्यांनी आपले अर्ज दि. १० फेब्रुवारीपर्यंत तहसील कार्यालय, सातारा येथे सादर करावेत. या योजनेचा जास्तीत जास्त पात्र कलाकारांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.