इकोफायचा महिंद्रा सोलाराइझसोबत सहयोग

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २० मार्च २०२३ । मुंबई । इकोफाय या क्लायमेट-पॉझिटिव्ह विभागांसाठी हरित फायनान्स देणाऱ्या एव्हरसोर्स कॅपिटलचे पाठबळ असलेल्या एनबीएफसीने नवीकरणीय ऊर्जा विभागातील तंत्रज्ञानदृष्ट्या उच्च दर्जाचे व सर्जनशील सोल्यूशन्स प्रदाता महिंद्रा सोलाराइझसोबत सहयोगाची घोषणा केली आहे. रिटेल विभागात रूफटॉप सोलार फायनान्सिंग व इन्स्टॉलेशनसाठी हा सहयोग इकोफायला महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थान या राज्यांमधील ५० हून अधिक डीलर्स उपलब्ध करून देईल, ज्यामुळे त्यांचा संभाव्य ग्राहकवर्ग ५००० हून अधिक ग्राहकांपर्यंत वाढेल.

आज महिंद्रा सोलाराइझ हरित व सुस्पष्ट तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यावरणाचे रक्षण आणि जतन करण्यासाठी प्रयत्नशील आहे, तसेच सक्रिय नवीकरणीय ऊर्जा शोधणाऱ्यांना उत्तम दर्जाच्या सोलार उत्पादनांचा पुरवठा करत आहे.

इकोफायच्या सह-संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी राजश्री नाम्बियार म्हणाल्या, ‘‘सोलार रूफटॉप्सच्या बाजारपेठेत भरपूर क्षमता आहे आणि सरकार लोकांना त्यांच्या घरांमध्ये व व्यवसायांमध्ये शाश्वत ऊर्जेचा अवलंब करण्यास प्रोत्साहित करत आहे. महिंद्रा सोलाराइझसोबत सहयोग करताना आम्हाला आनंद होत आहे आणि आमची सामायिक वचनबद्धता, त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य व अत्याधुनिक तंत्रज्ञानासह आम्हाला प्रत्येक भारतीय घरापर्यंत पोहोचण्यात मदत होईल, असा ठाम विश्वास आहे. या सहयोगाचा ५० कोटींच्या क्रेडिट लाइनसह ५००सोलार रूफटॉप्स स्थापित करण्याचा उद्देश आहे.’’

महिंद्रा सोलाराइझचे मुख्य कार्यकारी अधिकारी व कार्यकारी संचालक राकेश सिंग म्हणाले, ‘‘आम्हाला इकोफायसोबत सहयोग करण्याचा आनंद होत आहे. ते आम्हाला परवडणाऱ्या वित्तपुरवठ्यासह ग्राहकांना आमचे उपाय ऑफर करण्यामध्ये मदत करतात. सोलार रूफटॉप बाजारपेठेत प्रचंड विकासाची क्षमता आहे आणि सरासरी ४० टक्क्यांच्या विकास दरासह पुढील पाच वर्षांमध्ये एकूण क्षमतेत १८.८ गिगावॅटची वाढ होण्याची अपेक्षा आहे (ब्रिज टू इंडिया रिपोर्ट). स्थापित केलेल्या सोलार रूफटॉपमुळे घरांसाठी व व्यवसायांसाठी मासिक वीज बिल जवळपास ७० टक्क्यांनी कमी होईल. सहयोगाने आम्ही अधिकाधिक व्यक्तींना परवडण्याजोग्या नवीकरणीय ऊर्जेमध्ये संक्रमण करण्यास आणि ऊर्जा स्वावलंबी बनण्यास मदत करू शकतो.’’


Back to top button
Don`t copy text!