पर्यावरणपूरक गणेश मूर्तींना प्राधान्य द्यावे; फलटण नगर परिषदेचे आवाहन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ४ ऑगस्ट २०२३ | फलटण |
फलटण नगर परिषदेच्या आरोग्य विभागाने आगामी गणेशोत्सवासाठी कुंभार समाज व लहान मूर्तीकार व नागरिकांना आवाहन केले आहे की, मूर्तीकारांनी पर्यावरणपूरक व नैसर्गिक, विघटनशील कच्च्या मालापासून मूर्ती बनवाव्यात. तसेच प्लास्टर ऑफ पॅरीस व थर्माकॉलच्या मूर्ती बंदीचे पालन करावे, अशी माहिती फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संजय गायकवाड यांनी दिली.

याबाबत नगर परिषदेने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, फलटण शहरात पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्याकामी प्लास्टर ऑफ पॅरीसपासून बनविलेल्या मूर्तीच्या बंदी बाबत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, दिल्ली यांनी दि. १२ मे २०२० रोजी पारित केलेले मार्गदर्शन तत्वानुसार कोणत्याही विषारी, अजैविक कच्चा माल जसे की, पारंपारिक चिकणमाती आणि माती तसेच प्लास्टर ऑफ पॅरीसपासून प्लास्टिक आणि थर्माकॉल (पॉलोस्टेरीन) विरहीत नैसर्गिक, जैव विघटनशील पर्यावरणास अनुकूल असलेल्या कच्च्या मालापासून बनवलेल्या मूर्तीना प्रोत्साहन/अनुमती देण्यात यावी व प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तीवर बंदी घालण्यात यावी, असे सूचित करण्यात आले आहे.

सदरची मार्गदर्शक तत्वे धार्मिक उत्सव साजरे करताना नैसर्गिक जलस्त्रोतांच्या गुणवत्तेवर व पर्यावरणावर कोणताही परिणाम न होता पर्यावरणपूरक मूर्तीचे विसर्जन सुनिश्चित करण्यासाठी तयार करण्यात यावेत. फलटण शहरातील समस्त कुंभार समाज व लहान मूर्तिकार आणि नागरिक यांना सूचित करणेत येते की, पर्यावरण पुरक गणेश उत्सव साजरा करणे कामी प्लास्टर ऑफ पॅरीसपासून बनविलेल्या मूर्तीवर बंदी घालणेबाबत सूचित करणेत आले आहे. तसेच पर्यावरणास अनुकूल असलेल्या कच्च्या मालापासून बनवणेत आलेल्या मूर्तीना केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, दिल्ली यांनी पारित केलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या अन्वये परवानगी देणेत आलेली आहे, याची दक्षता घ्यावी.


Back to top button
Don`t copy text!