“जीवन सुंदर आहे” या रोहित साळुंखे यांच्या काव्यसंग्रहाचे खा. शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.११ मे २०२२ । सातारा । यशवंतराव चव्हाण समाजकार्य  महाविद्यालय जकातवाडी, जिल्हा सातारा या  महाविद्यालयातील विद्यार्थी रोहित साळुंखे यांच्या “जीवन सुंदर आहे” या काव्यसंग्रहाचे प्रकाशन खा शरद पवार यांच्या हस्ते संपन्न झाले.
आपल्या प्रतिभेच्या जोरावर नवोदित लेखक, कवी रोहित साळुंखे यांनी “जीवन सुंदर आहे” या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून विविध सामाजिक घटकांना स्पर्ष केला आहे. या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून मानवी भाव – भावना आणि अनुभव अतिशय प्रगल्भतेने व्यक्त केले आहेत. या पुस्तकातील सर्व कविता निसर्ग, कोरोना महामारी, मानवी मन, श्रद्धा –  अंधश्रद्धा व मानवी जीवन यांवर आधारित आहेत. मानवी जीवन हे अतिशय सुंदर आहे आणि ते कोणत्याही कारणाने संपवू नये असा अनमोल संदेश हा काव्यसंग्रह देऊन जातो. मानवी जीवन परिपूर्ण करण्याच्या उत्कट भावनेने माणसाच्या विवेकाला जागरूक करण्याचा प्रयत्न रोहित साळुंखे यांनी केला आहे.
खा. शरद पवार  यांनी रोहित साळुंखे यांच्या काव्यसंग्रहाचे कौतुक करत असतानाच, या काव्यसंग्रहातील ‘अंधश्रद्धेचं जाळं’ ही कविता त्यांना भावल्याने त्यांनी ती कविता उपस्थितांना वाचून दाखवली आणि यापुढेही असे प्रगल्भ लेखन व्हावे अशा शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर खा. सुप्रियाताई सुळे यांनीही रोहित यांच्या काव्यसंग्रहाचे कौतुक करत, अजुन लेखक वृत्ती बळावण्यासाठी शुभेच्छारुपी प्रोत्साहन दिले. “जीवन सुंदर आहे” या पुस्तकाची प्रस्तावना ज्येष्ठ विचारवंत प्राच्यविद्या पंडित, लेखक डॉ. आ. ह.साळुंखे यांनी लिहिलेली आहे. डॉ. साळुंखे यांनी रोहित यांच्या साहित्यिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रमुख पाहुणे म्हणून  शखा. श्रीनिवास पाटील , पद्मश्री लक्ष्मण माने , भा. भ. वि. वि. संस्थेचे कार्याध्यक्ष भाई  माने, प्रकल्प समन्वयक जिल्हा परिषद, साताराचे  राजेश भोसले आदी उपस्थित होते.

Back to top button
Don`t copy text!