खा. श्री. छ उदयनराजे भोसले यांनी विविध कामांचा घेतला आढावा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. ०६ : सातारा नगरपरिषदेच्या पदाधिकार्‍यांसह, विभाग प्रमुख असलेल्या अधिकार्‍यांसमवेत झालेल्या बैठकीत खा. श्री. छ उदयनराजे भोसले यांनी विविध कामांचा आढावा घेतला. त्यानंतर युनियन क्लब, यादोगोपाळपेठ बगिचा, जुन्या नगरपालिकेच्या इमारतीमध्ये होणार्‍या आर्ट गॅलरी, सदाशिवपेठ भाजी मंडई, करंजे येथील होणारी पाण्याची टाकी आणि नवीन शाळा,माजगांवकरमाळ घरकुल योजना, हुतात्मा स्मारक, करिअप्पा चौक विकास, नवीन प्रशासकीय इमारत, कर्मवीर हौसिंग सोसा. मेडिटेशन हॉल, इत्यादी ठिकाणच्या कामांची जागेवर जावून पाहाणी केली. यावेळी अधिकार्‍यांनी सामान्यांना केंद्रबिंदू मानुन काम करावे. गेल्या तीन-चार महिन्यांपासून कोरोनाशी लढा देत असताना, विकास कामांच्या पाठपुराव्यास जरी मर्यादा आल्या असल्या समयबद्ध नियोजन करुन, लोकहिताची कामे मार्गी लावा. त्यासाठी सर्व अधिकार्‍यांनी आपापली जबाबदारी पार पाडावी, अशा सूचना खा. उदयनराजे भोसले यांनी दिल्याा.

यावेळी युनीयन क्लबच्या पाठमागील बाजुस नगरपरिषदेची 57 गुंढे मोकळी जागा आहे. या जागेचा चांगला विनियोग करताना, युनियन क्लबशी बोलणी करुन, चांगले नियोजन करता येईल. या मोकळया जागेच्या उपयोगाबरोबरच युनियन क्लबची जुनी इमारतही नव्याने बांधून चांगली वास्तु याठिकाणी निर्माण करता येईल, असे मत खा. उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.

यादोगोपाळपेठ येथील कै.श्रीमंत छत्रपती प्रतापसिंहमहाराज उर्फ दादामहाराज गार्डनच्या ओढयाला रिटेनिंग वॉलचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. येथील जागेचा उंचसखल-चढउताराचा फायदा घेवून, लॅन्डस्केपिंगचे डिझााईन तयार करण्यात आलेले आहे, हे गार्डन अस्तित्वात आल्यावर एक देखण्या गार्डनचा लाभ, सातारकरांना घेता येईल. याकामाचे टक्नीकल सॅक्शनची रक्कम तातडीने आजच प्रदान करा, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

नगरपरिषदेच्या जुन्या इमारतीमध्ये आर्ट गॅलरीचा डिझाईनची पाहाणी झाल्यानंतर मुख्य इमारतीच्यावर दुसरा मजला वाढवून सुंदर अशी आर्ट गॅलरीची उभारणी करण्यात येणार आहे. जुन्या इमारतीचा सुमारे 20 फुटांचा पुढील भाग रोड वायडींगमध्ये जाणार असल्याने, येथील कॉर्नरचा रस्ताही चांगला रुंद होणार आहे आणि नागरीकांना विविध प्रदर्शनासाठी एक चांगली उपयोगी वास्तु अस्तित्वात येईल असे मत खा. उदयनराजे यांनी व्यकत केले.

नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या जागेची आज मोजणी, मोजणी खात्याकडून सुरु करण्यात आली. त्या कामाचीही पाहणी खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी यावेळी केली. तसेच जनरल करिअप्पा चौक येथील पडलेली भिंतीची पाहाणी, माजगांवकर माळ येथील घरकुल योजना, हुतात्मा स्मारक, कर्मवीर हौसिंग सोसायटी येथील मेडिटेशन हॉल, सदाशिवपेठ मटण मार्केट, कमानी हौद जतन, सुशोभिकरण व विकास, आदी विकास कामाबाबत प्रत्यक्ष जागेवर पहाणी करुन, खा. उदयनराजे भोसले यानी कामे जलदगतीने होण्याबाबत उपस्थितांना सूचना केल्या. या सर्व कामांमध्ये, आवश्यकता भासेल तेथे आम्ही उभे राहू. परंतु, कामे झालीच पाहीजेत अशा सूचना खा. उदयनराजे भोसले यांनी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व उपस्थित पदाधिकारी व अधिकार्‍यांना दिल्या.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!