
दैनिक स्थैर्य | दि. ०३ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
नीरा-देवघर प्रकल्पाला निधी मंजूर केल्याबद्दल खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा शनिवार, दि.४ फेब्रुवारी रोजी होणारा नागरी सत्काराचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे, असे संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे काका तसेच धनंजय महामुलकर यांचे वडील संपतराव महामुलकर यांचे दुःखद निधन झाल्यामुळे खासदारांचा हा नागरी सत्कार सोहळा कार्यक्रम रद्द केल्याचे संयोजकांनी सांगितले आहे.