दैनिक स्थैर्य | दि. ०२ फेब्रुवारी २०२३ | फलटण | नीरा-देवघर प्रकल्पाला निधी मंजूर केल्याबद्दल खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा नागरी सत्कार शनिवार, दि.४ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता गजानन चौक, फलटण येथे आयोजित केला असल्याची माहिती जयकुमार शिंदे, बजरंग गावडे, अमोल सस्ते, अशोकराव जाधव यांनी दिली आहे.
गेली अनेक वर्षे नीरा-देवघर प्रकल्प रखडला होता. त्यासाठी उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी निधी मंजूर करीत सुधारित शासकीय मान्यता दिली. त्यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी खूप प्रयत्न केले होते. त्यामुळे भारतीय जनता पक्ष व सर्व शेतकर्यांनी आपले लाडके पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी या प्रकल्पाला सुधारित मान्यता मिळवून दिल्याने त्यांचा भव्य असा नागरी सत्कार आयोजित केला आहे. या सत्काराला छत्रपती आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, आमदार शहाजीबापू पाटील, आमदार राम सातपुते, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील,विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर उपस्थित राहणार आहेत.
शनिवार, दि.४ रोजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे खंडाळा येथे आगमन होईल. त्यानंतर खंडाळा, लोणंद येथे भाजपा व शेतकरी त्यांचे स्वागत करतील. त्यानंतर सायंकाळी जिंती नाका फलटण येथे जाऊन तेथून त्यांची भव्य व दिव्य मिरवणूक निघेल. ते मलठण मधून गजानन चौक येथे उपस्थित राहतील व त्या ठिकाणी त्यांचा भव्य असा सर्वांच्या उपस्थितीत त्यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे.