कोयना परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का


दैनिक स्थैर्य । दि. २२ जुलै २०२२ । सातारा । कोयना परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का बसला आहे. आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा धक्का बसला असून याची तीव्रता 3.0 रिश्टर असल्याची माहिती उपकरण उपविभाग, कोयना नगर उपविभागीय अभियंता यांनी दिली आहे.

या भूकंपाचा केंद्र बिंदू कोयना खोऱ्यात हेळवाक गावाच्या नैऋतेस 7.0 कि.मी अंतरावर आहे.


Back to top button
Don`t copy text!