स्थैर्य, सातारा, दि. 6 : वाई पोलीस उपविभागाच्या पोलीस उपाधीक्षक डॉ. शितल जानवे (खराडे) यांनी सोमवारी रात्री पदभार स्वीकारला. त्यांनी आपल्या शासकीय कारकीर्दीची सुरुवात गव्हर्मेंट मेडिकल ऑफिसर, कोल्हापूर येथून पंचायत समिती पन्हाळा येथून केली. 2008 ते 20013 या कालावधीत त्यांनी येथे काम केले. यावेळी 2011 मध्ये त्यांनी पोलीस उपाधिक्षकपदासाठी एमपीएससीची परीक्षा दिली. याच परीक्षेत त्या पास झाल्या. त्यानंतर नाशिक येथे ट्रेनिंग झाल्यानंतर 2013 पासून त्या पोलीसउपाधिक्षक या पदावर कार्यरत आहेत. सुरुवातीला त्यांनी यवतमाळ येथे प्रोबेशनरी पोलिस उपाधिक्षक म्हणून पोलीस सेवेला सुरवात केली. त्यानंतर नाशिक, रत्नागिरी, चिपळून, खेड येथे त्यांची नियुक्ती झाली. चिपळूण आणि खेड या दोन डिव्हिजनमधील नऊ ठाण्यांचा कार्यभार त्यांच्याकडे होता. पुढे त्यांनी राज्य गुप्तवार्ता विभागात अप्पर उपआयुक्त म्हणून काम केले. नुकतीच त्यांची तुरची (जिल्हा सांगली) येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये उपप्राचार्य म्हणून नेमणूक झाली होती. तेथून त्यांची वाई येथे पोलीस उपविभागामध्ये पोलीस उपअधीक्षक म्हणून नियुक्ती झाली असून त्यांनी सोमवारी रात्री या पदाचा पदभार स्वीकारला.