स्थैर्य, फलटण, दि.२५ : साखरवाडी ता. फलटण येथील न्यू फलटण शुगर वर्क्स हा साखर कारखाना दत्त इंडिया कंपनीने NCLT च्या माध्यमातून घेतल्यानंतर NCLT च्या कोर्टाच्या माध्यमातून असणारी शेतकऱ्यांची सर्व पेमेंट दत्त इंडिया कंपनीने अदा केलेली आहेत. यापुढे NCLT च्या नियमानुसार राहिले असलेले सर्व पैसे दत्त इंडिया कंपनीने दिलेले आहेत. व ज्या शेतकऱ्यांनी NCLT चे फॉर्म भरलेले नव्हते, अशा सर्व शेतकऱ्यांचे पैसे राहिले होते. त्या सर्व शेतकऱ्यांचे ऊस बिल रूपये एक हजारने देण्यात येणार आहे. व उरलेले सर्व ऊस बिल टप्प्याटप्प्याने श्रीदत्त इंडिया कंपनी कडून आपण मिळवुन देणार आहे अशी ग्वाही, अशी माहिती विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली.
या वेळी महानंदाचे उपाध्यक्ष डि. के. पवार, माजी सभापती शंकरराव माडकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सतीश माने, के. के. भोसले, समीर भोसले, माऊली भोसले, अभयसिंह नाईक निंबाळकर, माजी पंचायत समिती सदस्य सागर कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
न्यू फलटण शुगर वर्क्सच्या 5800 सभासदांपैकी 3600 सभासदांना NCLT कोर्टाच्या माध्यमातून त्यांचे उसाचे बिल त्यांना अदा झालेले आहे व उर्वरित ज्या सभासदांची बिले राहिलेले होती. अशा सर्व शेतकर्यांना न्यू फलटण शुगर वर्क्सकडे ऊस घातलेला होता, अशा सर्व शेतकऱ्यांना दत्त इंडिया कंपनी आगामी काळामध्ये नक्कीच उसाचे बिल देणार आहे. असेही श्रीमंत रामराजे यांनी स्पष्ट केले.