
दैनिक स्थैर्य | दि. 09 एप्रिल 2025 | कोळकी | ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हळदीकुंकू समारंभा नंतर काही ठराविक महिलांनाच वाण म्हणून डस्टबिनचे वाटप करण्यात आलेले होते. तरी आता सरसकट सर्व घरांना डस्टबिन देण्यात यावे, अशी मागणी ग्रामपंचायत मध्ये करण्यात आलेली आहे.
याबाबत कोळकी ग्रामपंचायत सरपंच सौ. अपर्णा विक्रम पखाले व ग्रामविस्तार अधिकारी रमेश साळुंखे यांच्याकडे ग्रामपंचायत सदस्य सौ. रेश्मा संजय देशमुख, लक्ष्मीदेवी रणजितसिंह निंबाळकर, सौ प्राजक्ता सागर काकडे, सौ. निर्मला यशवंत जाधव, सौ रूपाली सागर चव्हाण, विकास अशोक नाळे, गणेश दिनकर शिंदे यांनी केलेली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जानेवारी महिन्यामध्ये कोळकी ग्रामपंचायतीच्या वतीने कोळकी गावातील महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी काही ठराविक महिलांना डस्टबिनचे वाटप वाण म्हणून करण्यात आले होते.
तरी आता कोळकी गावातील सर्व महिलांना वाण म्हणून डस्टबिनचे वाटप ग्रामपंचायतच्या माध्यमातून करण्यात यावे अशी मागणी करण्यात आलेली आहे.