दुसाळे, ता. पाटण रेथील जवान सचिन संभाजी जाधव शहीद


 

स्थैर्य, उंब्रज, दि.१८: दुसाळे, ता. पाटण रेथील जवान सचिन संभाजी जाधव वय 38 हे लेह-लडाख सिमेवर कर्तव्र बजावत असताना झालेल्रा चकमकीत शहीद झाले. ही घटना बुधवारी दिनांक 16 सप्टेंबर रोजी घडली. शनिवार दिनांक 19 रोजी त्रांच्रा पार्थिवावर दुसाळे ता.पाटण रा त्राच्रा गावी शासकीर इतमामात अंत्रसंस्कार करण्रात रेणार आहेत. रासाठी ग्रामस्थ व प्रशासनाकडून तरारी करण्रात आली आहे. त्रांच्रा पाश्‍चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.

सचिनचे वडील सुमारे वीस वर्षापूर्वी मेजर सुभेदार पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. सचिन रांचे प्राथमिक शिक्षण दुसाळे गावात झाले. त्रानंतर सातारा रेथे उच्च शिक्षण घेत असतानाच 2002 साली ते पुणे रेथे भरती झाले. त्रांनी लेह लडाख, जम्मू काश्मीर, पुणे रेथे सेवा बजावली होती.सध्या ते पुन्हा लेह लडाख रेथे कार्ररत होते. तर लहान भाऊ सुमारे दहा वर्षापूर्वी देशसेवेत रूजू झाला आहे. सुमारे तीन महिन्रपूर्वी ते दोन महिन्राच्रा सुटीवर गावी आले होते. चीन सीमेवर सुरू असलेल्रा रुद्धजन्र स्थितीमुळे एक महिन्रातच त्रांची रजा रद्द करण्रात आली. ते तातडीने देशसेवेसाठी कर्तव्रावर हजर झाले. ते सध्या 111 इंजिनिररींग रेजिमेंट मध्रे नाईक पदावर काम करत होते. दरम्रान सिमेवर गस्त घालत असताना घुसखोरी करणार्‍रा चीनच्रा सैनिकांना अटकाव करताना झालेल्रा चकमकीत ते शहीद झाल्राची प्राथमिक माहिती गावकर्‍यांकडून मिळाली आहे. बुधवारी ही घटना घडली असून गावात माहिती कळताच घरच्रांनी एकच आक्रोश केला.

रा घटनेने दुसाळे गावासह पाटण तालुक्यात शोककळा पसरली आहे. त्रांचे पार्थिव हेलिकाप्टरने श्रीनगरमध्रे आणले जाणार आहे. तेथे मानवंदना देऊन विमानाने पार्थिव दिल्लीत रेणार आहे. त्यानंतर पुणे रेथे पार्थिव रेणार असून तेथे मानवंदना दिल्रानंतर पार्थिव दुसाळे रेथे रेणार असून शासकीर इतमामात अंत्रसंस्कार केले जाणार आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!