प्रेयसीच्या वादातून पोलिस ठाण्यातच खून झल्याची चर्चा
स्थैर्य, सातारा, दि. ०४ : अदखलपात्र तक्रारीच्या चौकशीसाठी सातारा तालुका पोलीस ठाण्यात आलेल्या दोघांमध्ये गुरुवारी दुपारी धारदार शस्त्राने हाणामारी झाली. यात गंभीर जखमी झालेल्या एकाचा उपचारादरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यु झाला. मृत झालेल्या व्यक्तीने पोलीस ठाण्यात आल्यानंतर विरोधी गटातील एकावर कोयत्याने हल्ला चढवला. वार केल्यानंतर त्याच्या हातातील कोयता जमिनीवर पडला. पडलेला कोयता उचलून विरोधी गटातील व्यक्तीने पहिल्यांदा हल्ला करणाऱ्यावर हल्ला केला.वार जिव्हारी बसल्याने पहिल्यांदा हल्ला करणारा गंभीर जखमी झाला व त्यातच त्याचा मृत्यु झाला. तालुका पोलीस ठाण्यात झालेल्या खूनी हल्ल्यात एकाचा मृत्यु झाल्याचे समजताच वरिष्ठ पोलीस अधिकारी त्याठिकानी दाखल झाले.
प्रेयसीच्या वादातून आज तालुका पोलिस ठाण्यातच भरदिवसा एकाला कोयत्याने उभा चिरल्याची थरारक घटना घडली. हल्ला करण्यासाठी आलेल्याच्यनि कोयत्यानेच डोक्यात व हातावर गंभीर वार केले. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. पोलिस ठाण्यामध्येच खून होण्याची ही जिल्ह्यातील पहिली घटना आहे.
सुरेश प्रल्हाद कांबळे (वय 44, रा. सैदापूर) असे मृताच नाव आहे. तर, रामा दुबळे (रा. मतकर कॉलनी) असे त्याला मारणाराचे नाव आहे. या मारामारीत रामा दुबळेही जखमी झाला आहे. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबातची अधिक प्राथमिक माहितीनुसार, रामा दुबळे याची सासुरवाडी सैदापूरमध्ये आहे. त्याच वस्तीत सुरेश कांबळे हा त्याच्या कुटुंबासह राहत होते. रामा दुबळे याची पहिली दोन लग्न झाली आहेत. आता त्याचे दुसऱ्या एका मुलीबरोबर फिरणे चालू होते. त्या मुलीचा सुरेश कांबळे याच्या मुलीशी वाद झाला होता. त्याबाबत त्या मुलीने रामाला माहिती दिली. त्यानंतर रामाने सुरेश कांबळेच्या मुलीला शिवीगाळ व मारहण केली. तीन दिवसापूर्वी याबाबत सुरेशच्या मुलीने तालुका पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता.
दाखल तक्रारीमध्ये आज दोघांनाही तालुका पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले होते. सुरेश कांबळे हा आधीच तालुका पोलिस ठाण्यात आला होता. त्याने सोबत कोयता आणला असल्याची कोणाला माहिती नव्हती. थोड्या वेळाने रामा दुबळेही पोलिस ठाण्यात आला. तो पोलिस ठाण्यात आल्या-आल्याच सुरेश कांबळेने रामा दुबळेवर पोलिसांसमोरच कोयत्याने वार करण्यास सुरवात केली. त्यामुळे पोलिस ठाण्यात एकच गोंधळ उडाला. हल्ला करत-करत दोघे पोलिस ठाण्याच्या बाहेर पर्यंत आले. या वेळी सुरेश कांबळेच्या हातातून कोयता निसटून खाली पडला. हि संधी साधत रामा दुबळेने तो कोयता उचलला आणि सुरेश कांबळेच्या डोक्यात, हातावर सपासप वार करायला सुरवात केली. त्यामुळे पोलिस ठाण्याच्या आवारात रक्ताचा सडाच पडला होता.
यामध्ये एक पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाला आहे. गंभिर हल्ला व रक्तस्त्रावामुळे सुरेश कांबळे खाली कोसळला. तसेच रामाच्या शरिरातूनही रक्त वहात होते. पोलिसांनी दोघांनाही उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु, सुरेश कांबळेचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. रामा दुबळेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, पोलिस ठाण्यात झालेल्या या थरारक प्रकारामुळे पोलिसही चक्रावून गेले होते. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त अधिक्षक धिरज पाटील यांनी तातडी तालुका पोलिस ठाण्यात धाव घेऊन पाहणी केली. त्यांनी अधिकाऱ्यांना तपासाबाबतच सुचनाही दिल्या. याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया तालुका पाेलिस ठाण्यात सुरू हाेती.