दिवसभरात जिल्ह्यातील 40 नागरिकांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


जिल्ह्याची कोरोना बाधीत रुग्ण संख्या 689

स्थैर्य, सातारा दि. 10 :  सातारा जिल्ह्यात आज 40 कोरोना बधित रुग्ण आढळून आल्याने पुन्हा एकदा कोरोनाची दहशत वाढू लागली आहे. एकूण रुग्णसंख्या 689 इतकी झाली असून आज पर्यंत 489 रुग्ण बरे झाले आहेत तर,  एकूण 28 रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली आहे.

आज जिल्ह्यात कोरोना बधितांचे प्राप्त झालेल्या अहवालानुसार सातारा जिल्ह्यातील विविध कोरोना केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालय येथे अनुमानित म्हणून भरती असलेल्या 40 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये फलटण तालुक्यातील तांबवे येथील 25 वर्षीय पुरुष.,जावळी तालुक्यातील ओझरे येथील 75 वर्षीय पुरुष., कराड तालुक्यातील तुळसण येथील 26, 60, 51 वर्षीय पुरुष, 28, 40 वर्षीय महिला, केसे येथील 50,42,64,20 व 60 वर्षीय महिला, 20 वर्षीय पुरुष. शिंदेवाडी येथील 42 वर्षीय् महिला., वाई तालुक्यातील वेरुळी  येथील 46 वर्षीय पुरुष, 11 वर्षीय मुलगा , 26 वर्षीय महिला., सातारा तालुक्यातील कुसवडे येथील 19 व 47 वर्षीय महिला, देगांव येथील 55 वर्षीय पुरुष.

खंडाळा तालुक्यातील आसवली येथील 25 वर्षीय पुरुष पाटण तालुक्यातील जांभेकरवाडी येथील 30 वर्षीय पुरुष महाबळेश्वर येथील 29 वर्षीय महिला, जावली तालुक्यातील भणंग येथील 21 वर्षीय पुरुष व 24 वर्षीय महिला, धोंडेवाडी येथील 63 पुरुष, 57 वर्षीय पुरुष सातारा तालुक्यातील पिंपळवाडी धावडशी येथील 15 वर्षीय मुलगी व 12 वर्षीय मुलगा, शाहुपुरी सातारा येथील 58 वर्षीय पुरुष वाई तालुक्यातील व्याजवाडी येथील 27, 29 वर्षीय पुरुष व 22 वर्षीय महिला, पाचवड येथील 39 वर्षीय महिला व 13 व 16 वर्षाच्या मुली, वेळे येथील 59 वर्षीय पुरुष माण तालुक्यातील गोंदवले ब्रुद्रुक येथील 63 वर्षीय महिला खटाव तालुक्यातील मासूरने येथील 24 वर्षीय पुरुष व गुरसाळे येथील 39 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.

जिल्ह्यात एकूण कोरोना बधितांची वाढती संख्या सोबत बरे होणाऱ्या रुग्णाची संख्या देखील दिलासा देणारी असली तरी येत्या काळात सातारा जिल्ह्यात बधितांची हजाराकडे वाटचाल सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!