
दैनिक स्थैर्य । दि. ६ ऑक्टोंबर २०२२ । बिबी । बिबी ता. फलटण येथे दुर्गामाता विसर्जन धुमधडाक्यात करण्यात आले.
रात्री नवरात्रीचा समुह कार्यक्रम झाला. यानिमित्त दररोज वेगवेगळे कार्यक्रम राबवण्यात आले. सिद्धिविनायक तरुण मंडळ बिबी या ठिकाणची दुर्गा मातेची मिरवणुक धुमधडाक्यात काढण्यात आली.
सिद्धिविनायक तरुण मंडळाच्या परिसरामध्ये आज महिलांसाठी दांडियाचा कार्यक्रम व पुरुषांसाठी व युवकांसाठी सांस्कृतिक गजेचा कार्यक्रम राबविण्यात आला होता. गजे खेळणार्या पुरुषांनी पांढरा कुर्ता व फेटा घातला होता.
यावेळी सिद्धिविनायक तरुण मंडळाचे अध्यक्ष मारुती कुंभार व मंडळाचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते, गावचे पोलीस पाटील अजित बोबडे, गावचे उपसरपंच सचिन बोबडे व गावचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.