दुर्गामाता फाउंडेशनतर्फे ऊसतोड कामगारांसाठी मदतीचे आवाहन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । 21 मार्च 2025। तरडगाव । शिंदेमाळ येथील दुर्गामाता चॅरिटेबल फाउंडेशनच्यावतीने रविवार दि. 23 मार्च रोजी दुपारी 2 वाजता जेऊर फाटा, रेल्वे पुलाजवळ ऊसतोड कामगार, मुले व कुटुंबियांसाठी कपडे, चप्पल, शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.

याठिकाणी होणार्‍या कार्यक्रमात ऊसतोड कामगारांच्या 39 मुला- मुलींना कपडे, चप्पला, शालेय साहित्य, मुला – मुलींसाठी सलून सेवा, अल्पोपहार तसेच महिलांना साड्यांचे वाटप करण्यात येणार आहे. इच्छुकांनी देणगी व वस्तुरूपी मदत करण्याचे आवाहन फाऊंडेशनच्यावतीने करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!