दैनिक स्थैर्य | दि. २२ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
श्री शिवप्रतिष्ठान, फलटण यांनी शिस्तबद्ध पद्धतीने दुर्गामाता दौड २० ऑटोबर रोजी सकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती करून सुरू करण्यात आली.
यावेळी लहान मुले छत्रपती शिवाजी महाराज यांचे हुबेहूब पगडी व संपूर्ण शिवाजी महाराज पेहराव करून आले होते. यावेळी महिलांनी नऊवारी साडी परिधान केली होती. हातात समशेर घेतली होती. व मोठ्या मुलांनी मावळ्याप्रमाणे वेश परिधान केला होता. मावळ्यांची पगडी, कपाळावर टिळा, हतात समशेर व काहीजणांनी हातात भाला घेऊन आले होते.
दुर्गामाता दौडला खास करून महिला, तरुणी व लहान लहान मुले उत्सवात सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून दुर्गामाता दौड सुरू झाली. तेथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, महावीर स्तंभ येथून राजे उमाजी राजे चौक येथून गजानन चौक, धनगर वाडा तेथून कामगार वसाहत येथून महानुभाव पंथाचे श्रीकृष्ण मंदिर मारवाड पेठ येथून बारस्कर गल्ली रोड, तेथून शुक्रवार पेठ, नदीच्या पुलावरून मलठण परिसरातून सद्गुरू हरिबुवा मंदिर, नदीच्या पुलावरून खाटीक गल्ली येथे आली व तेथून दुर्गामाता दौड बुरुड गल्ली येथून आपला राजवाडा चौक फलटणचे ग्रामदैवत प्रभू श्रीराम सीता लक्ष्मण मंदिराला भगवा ध्वज प्रभू श्रीराम सीता लक्ष्मण यांच्या पायावर ठेवून आशिर्वाद घेतला. मंदिराला प्रदक्षिणा घालून पुन्हा छत्रपती शिवाजी वाचनालय येथून शिंपी गल्ली, नरसिंह चौक, खंडोबा मंदिर, शिवशक्ती चौक येथे व तेथून रविवार पेठ येथील लालगल्ली नवरात्र महोत्सव मंडळ येथून सिमेंट रोड मार्गे बारामती चौक येथून फलटण पंचायत समिती शेवटी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे समाप्त करण्यात आली.
दुर्गामाता दौडची सुरूवात झाल्यापासून ते दौड संपेतोपर्यंत सर्वांचा उत्साह पाहण्यासारखा होता. वाटेत जेवढी मंदिरे, नवरात्र महोत्सव मंडळे यांच्यापुढे रोडवर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.